Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

प्रा. डॉ. प्रशांत महाराज ठाकरे

मोरगाव काकड येथे विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप

Prof. Dr. Prashant Maharaj Thakre:


मोरगाव काकड येथे विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप

Prof. Dr. Prashant Maharaj Thakre |

बार्शीटाकळी (Prof. Dr. Prashant Maharaj Thakre) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मोरगाव काकड, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने विश्वस्नेह फाउंडेशनच्या माध्यमातून शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विश्वस्नेह फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. प्रशांत महाराज ठाकरे (Prof. Dr. Prashant Maharaj Thakre) यांच्या पुढाकारातून तसेच परिसरातील सर्व सन्माननीय प्रतिष्ठित नागरिकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत मन लावून अभ्यास करून आपल्या शाळेचे, पालकांचे व गावाचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन केले. समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळावी आणि त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे (Prof. Dr. Prashant Maharaj Thakre) प्रा. डॉ. प्रशांत महाराज ठाकरे यांनी सांगितले.

या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाबद्दल विश्वस्नेह फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. प्रशांत महाराज ठाकरे (Prof. Dr. Prashant Maharaj Thakre) तसेच सर्व सहकार्य करणाऱ्या प्रतिष्ठित नागरिकांचे शाळेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. “विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केलेली मदत हीच उज्ज्वल भविष्याची खरी गुंतवणूक आहे,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.