प्रवीण उपासे अनोखे आंदोलन

शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी प्रवीण उपासे यांचे जमिनीत गाडून अनोखे आंदोलन

Praveen Upase Andolan: कापसाला प्रति क्विंटल रु 15,हजार, सोयाबीनला प्रति क्विं. दहा हजार रु. कर्जमाफिची रक्कम बँकेत जमा करून पुढील हंगामासाठी बँके मार्फत कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे...

शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी प्रवीण उपासे यांचे जमिनीत गाडून अनोखे आंदोलन

Praveen Upase Andolan

हिंगणघाट (Praveen Upase Andolan) : कापसाला प्रति क्विंटल रु 15,हजार, सोयाबीनला प्रति क्विं. दहा हजार रु. कर्जमाफिची रक्कम बँकेत जमा करून पुढील हंगामासाठी बँके मार्फत कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, 25-26 या वर्षीचे पीकविमा रु 17हजार 500 प्रति हेक्टर त्वरित देण्यात यावे इत्यादी मागण्यासाठी सोमवार दिनांक 21 सप्टेंबरला  दुपारी प्रभाताई राव विचार मंचचे कार्याध्यक्ष प्रवीण उपासे  जेष्ठ नेत्या चारूताई राव यांच्या निर्देशानुसार यांनी स्वतःला जमिनीत गाडून अनोखे आंदोलन (Praveen Upase Andolan) करून प्रशासनाची झोप उडविली. अखेर साडेतीन तासानंतर ना. तहसीलदार एम एस भलावी यांनी घटनास्थळी येऊन निवेदन स्वीकारले. व वरिष्ठ अधिकाऱ्यांना तुमच्या भावना कळवितो असे आश्वासन दिल्या नंतर प्रवीण उपासे हॆ खड्ड्यातून बाहेर आले.

सोमवार 21 सप्टेंबरला  सकाळी 11 वाजता प्रभाताई राव विचार मंचाचे वतीने मुख्यमंत्री यांना लिहिलेले निवेदन देण्यासाठी सर्वं कार्यकर्ते एस डी ओ कार्यालया समोर एकत्रित आले होते. त्यावेळी विचार मंचचे कार्याध्यक्ष प्रवीण उपासे यांनी अचानक कचेरी समोर कार्यकर्त्यांच्या मदतीने खड्डा खोदून स्वतःला जमिनीत गाडून घेतले. (Praveen Upase Andolan) अखेर तीन तासानंतर ना. तहसीलदार भलावी हॆ घटनास्थळी आले व त्यांनी निवेदन स्वीकारले.

सदर मागण्यावर पंधरा दिवसात निर्णय न झाल्यास देवळी येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे प्रवीण उपासे यांनी सांगितले. प्रभाताई विचार मंच चे जिल्हाध्यक्ष रामेश्वर वाघ, डॉ रामकृष्ण खुजे, गुणवन्त कोठेकर, उदयजी डफळे डॉ पवनजी गोसेवाडे अभय वानखेडे अनिल हाते प्रवीण पणप, सुरेश अराडे गजानन बोरेकर रवींद्र लांबट, प्रमोद हिवरे,अशोक भोसले, अमोल खडसे, पंकज राऊत वामन बावणे पुरुषोत्तम भगत राजपाल फुलझेले अमोल कुकडे नानाजी मानकर दिनकर वैदय, राजू घुबडे, वैभव ठाकरे अमित मांडवकर प्रकाश निखाडे अनंता जोगवे अरविंद चौधरी इत्यादी उपस्थित होते.

टैग्स: Praveen Upase Andolan