Pradeep Purnekar Murder Case

‘आरोप सिद्ध होईपर्यंत पद बाजूला ठेवावे’; प्रताप सरनाईकांचा मिनाक्षी शिंदेंना अप्रत्यक्ष संदेश?

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला एक महिना; ठाकरे गटाचा मोर्चा रद्द, प्रताप सरनाईकांच्या वक्तव्याने मिनाक्षी शिंदे यांच्या पदाबाबत चर्चेला उधाण.

‘आरोप सिद्ध होईपर्यंत पद बाजूला ठेवावे’; प्रताप सरनाईकांचा मिनाक्षी शिंदेंना अप्रत्यक्ष संदेश?

सूत्रधारांवर कारवाईची मागणी करत ठाकरे गट आक्रमक; पोलिसांनी परवानगी नाकारल्याने सर्वपक्षीय मोर्चा रद्द, मिनाक्षी शिंदे यांच्या पदाबाबत चर्चेला उधाण

ठाणे : ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला असून, या प्रकरणातील कथित सूत्रधारांवर ठोस कारवाई न झाल्याचा आरोप करत ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यात सर्वपक्षीय मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे हा मोर्चा ऐनवेळी रद्द करण्यात आला. दरम्यान, शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी पक्षातील नेत्यांवर आरोप होत असल्यास संबंधितांनी पदापासून दूर राहावे, अशी भूमिका मांडल्याने मिनाक्षी शिंदे यांच्या पदाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या दोन दिवसांत पूर्णेकर हत्याप्रकरणावरून ठाकरे गटाने नौपाडा पोलीस ठाणे आणि घोडबंदर रोड येथे आंदोलन केले होते. पूर्णेकर यांच्या पत्नीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केल्याने राजकीय वातावरण अधिक तापले. या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली.

या पत्रकार परिषदेत सरनाईक यांनी पक्षातील एखाद्या नेत्यावर आरोप झाल्यास चौकशी पूर्ण होईपर्यंत त्या व्यक्तीने आपले पद बाजूला ठेवावे, अशी भूमिका मांडली. त्यांच्या या विधानाचा संबंध मिनाक्षी शिंदे यांच्याशी जोडला जात असून, त्यांना पक्षश्रेष्ठींकडून अप्रत्यक्ष संदेश देण्यात आला आहे का, याबाबत राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे.

मिनाक्षी शिंदे यांच्या पदाबाबत चर्चा

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा कट मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्या सांगण्यावरून आखण्यात आल्याचा आरोप पूर्णेकर कुटुंबीयांनी केला आहे. हे आरोप अद्याप सिद्ध झालेले नसून, त्याबाबतचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.

मिनाक्षी शिंदे या ठाण्यातील शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असून, त्यांचा स्थानिक राजकारणात प्रभाव आहे. त्या सध्या शिवसेनेच्या ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख अर्थात महिला जिल्हासंघटक आहेत. पूर्णेकर हत्याप्रकरणातील आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पदाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मिनाक्षी शिंदे यांच्याबाबत विचारणा झाली असता प्रताप सरनाईक यांनी कोणाचेही नाव थेट न घेता आपली भूमिका स्पष्ट केली. एखाद्या प्रकरणात स्वतःवर आरोप झाले, तर ते पक्षप्रमुखांना कळवून आरोप चुकीचे सिद्ध होईपर्यंत पदापासून दूर राहणे योग्य ठरेल, असे त्यांनी सांगितले. पक्षातील एखाद्या महिला नेत्यावर आरोप होत असतील, तर संबंधित पद बाजूला ठेवण्याबाबत आपण एकनाथ शिंदे यांच्याशी बोलल्याचेही सरनाईक यांनी नमूद केले.

२९ सप्टेंबरच्या हल्ल्याला एक महिना

२९ सप्टेंबरच्या रात्री प्रदीप पूर्णेकर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर ठाण्यात या प्रकरणाच्या निषेधार्थ विविध आंदोलने आणि मोर्चे काढण्यात आले. मात्र, घटनेला एक महिना उलटूनही प्रकरणातील सूत्रधारांवर ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करत ठाकरे गटाने सरकार आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

आज रात्री आठ वाजता पूर्णेकर कुटुंबीयांकडून शांततेत कँडल मार्च काढून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. त्याआधी आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि राजन विचारे हे पूर्णेकर यांच्या निवासस्थानी भेट देणार असून, त्यानंतर ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन पत्रकार परिषद घेण्याचे नियोजन आहे.

दरम्यान, सर्वपक्षीय मोर्चासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्याने नियोजित आंदोलन रद्द करण्यात आले आहे.

शिंदे गटाकडून आनंद आश्रमात जमण्याचे आदेश

दुसरीकडे, शिंदे गटानेही ठाण्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हालचाली वाढवल्या आहेत. पक्षाचे खासदार, मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना दुपारी २.३० वाजता आनंद आश्रमात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

ठाकरे गटाच्या भूमिकेला राजकीय प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदे गटाकडून शक्तिप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरण, आरोप-प्रत्यारोप आणि पोलिसांनी मोर्चाला नाकारलेली परवानगी या मुद्द्यांमुळे ठाण्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

संबंधित सामग्री

राज ठाकरेंची एकनाथ शिंदेंना धक्का देणारी खेळी! छावा संघटनेचे ३५० कार्यकर्ते मनसेत दाखल

राज ठाकरेंची एकनाथ शिंदेंना धक्का देणारी खेळी! छावा संघटनेचे ३५० कार्यकर्ते मनसेत दाखल

राज ठाकरेंच्या मनसेला दक्षिण रत्नागिरीत मोठे बळ! छावा संघटनेचे ३५० कार्यकर्ते आणि शिंदे गटातील पदाधिकारी मनसेत दाखल.

Nov 16, 2026
अमित शाहांच्या पुणे दौऱ्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? संजय शिरसाटांचे मोठे विधान; 'ऑपरेशन टायगर'चीही चर्चा!

अमित शाहांच्या पुणे दौऱ्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? संजय शिरसाटांचे मोठे विधान; 'ऑपरेशन टायगर'चीही चर्चा!

अमित शाहांच्या पुणे दौऱ्यात राजकीय घडामोडींचे संकेत! विलिनीकरण आणि ऑपरेशन टायगरवर संजय शिरसाटांचे मोठे विधान.

Nov 16, 2026
पुण्यात अमित शाहांच्या भेटीसाठी नेत्यांची रीघ! सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदेंशी बंद दाराआड चर्चा

पुण्यात अमित शाहांच्या भेटीसाठी नेत्यांची रीघ! सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदेंशी बंद दाराआड चर्चा

अमित शाहांच्या पुणे दौऱ्यात सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदेंची भेट; शिवसेनेच्या केंद्रीय मंत्रिपदाबाबत चर्चांना वेग.

Nov 16, 2026
पुण्यात अमित शाहांच्या भेटीसाठी नेत्यांची रीघ! सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदेंशी बंद दाराआड चर्चा

पुण्यात अमित शाहांच्या भेटीसाठी नेत्यांची रीघ! सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदेंशी बंद दाराआड चर्चा

अमित शाहांच्या पुणे दौऱ्यात सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदेंची भेट; शिवसेनेच्या केंद्रीय मंत्रिपदाबाबत चर्चांना वेग.

Nov 16, 2026
गोंदियात जंगलात महिलेची निर्घृण हत्या! तीन अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने केले सपासप वार

गोंदियात जंगलात महिलेची निर्घृण हत्या! तीन अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने केले सपासप वार

गोंदियात पुण्यातील ३५ वर्षीय महिलेची चाकूने वार करून हत्या. अर्जुनी-बोंडराणी जंगलातील घटनेने खळबळ; तीन अज्ञात आरोपींचा शोध सुरू.

Nov 16, 2026