न्यायाच्या मागणीसाठी समर्थकांचे १६ तास आंदोलन; मानपाडा परिसरात रास्तारोको, जाळपोळीनंतर पोलिसांचा बंदोबस्त
ठाण्यात शिवसेना नेते प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून वातावरण तापले असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतला. हत्या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा, अशी मागणी करत समर्थकांनी मानपाडा आणि नौपाडा परिसरात रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे प्रमुख मार्गांवरील वाहतूक अनेक तास विस्कळीत झाली. दरम्यान, आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाल्यानंतर दगडफेक व जाळपोळीच्या घटना घडल्या. यामध्ये काही पोलिस जखमी झाले आहेत.
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा तपास योग्य दिशेने व्हावा आणि संबंधित आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी पूर्णेकर कुटुंबीय आणि समर्थकांनी नौपाडा पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन सुरू केले होते. हरी निवास सर्कल परिसरात रस्ता अडवून ठिय्या देण्यात आला. या आंदोलनामुळे तब्बल १६ तास हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहिला.
Protesters Block #Ghodbunder Road in Manpada Demanding Justice for Pradeep Purnekar; Traffic Jam Hits #Thane #Mumbai Protesters blocked Ghodbunder Road in the Manpada area of Thane late on Tuesday night (October 27, 2026), burning tyres and staging a rasta roko to demand justice in the murder of Shiv Sena (UBT) Manpada division chief Pradeep Purnekar. The blockade caused severe traffic congestion that lasted well into the night. The protest intensified after police detained Purnekar’s son, Ram, earlier in the day. Ram had been trying to hold a demonstration outside the residence of Deputy Chief Minister Eknath Shinde to demand quicker action in the case. He was taken to Naupada police station; videos circulating online reportedly showed an assistant commissioner of police pushing him into an auto-rickshaw. This sparked immediate protests outside the station by family members, supporters, opposition leaders and activists, who blocked roads and demanded the arrest of former Thane mayor Meenakshi Shinde and her husband Rajendra Shinde. The agitation then shifted to Manpada, Azad Nagar and Manorama Nagar. Protesters burned tyres at the Manpada junction, blocked both directions of Ghodbunder Road, and also disrupted the Balkum–Bhiwandi road. Traffic was heavily affected between Manpada, Kapurbawdi and Kasarvadavali, with short stretches taking 45 minutes to an hour. Reports described large numbers of participants and slogans against the Shinde couple. The disruption continued late into the night. 1/2
— Siraj Noorani (@sirajnoorani) October 28, 2026
दुसरीकडे, पूर्णेकर यांचे वास्तव्य असलेल्या मानपाडा परिसरातही समर्थकांनी आंदोलन छेडले. मानपाडा उड्डाणपुलाखाली मंगळवारी रात्री सुरू झालेले ठिय्या आंदोलन पहाटेपर्यंत सुरू होते. या ठिकाणी महामार्गावरील वाहतूक सुमारे सहा तास ठप्प झाली होती. परिणामी परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली.
पोलिसांवर दगडफेक; काही कर्मचारी जखमी
वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांना रस्ता मोकळा करण्याचे आवाहन केले. मात्र, आंदोलकांनी या विनंतीला प्रतिसाद दिला नाही. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. त्यानंतर संतप्त झालेल्या काही आंदोलकांनी पोलिसांच्या दिशेने दगड आणि काचेच्या बाटल्या फेकल्या. या गोंधळादरम्यान जाळपोळीची घटनाही घडली. दगडफेकीत काही पोलिसांना दुखापत झाली.
घटनेनंतर पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यानंतर महामार्गावरील परिस्थिती नियंत्रणात आणत पोलिसांनी वाहतूक पूर्ववत केली. मानपाडा उड्डाणपुलाखाली पहाटेपर्यंत तणावाचे वातावरण कायम होते.
दरम्यान, नौपाडा पोलिस ठाण्याबाहेर सुरू असलेले आंदोलन १६ तासांनंतर स्थगित करण्यात आले. मानपाडा परिसरातील आंदोलनामुळेही नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. सध्या ठाण्यातील परिस्थिती नियंत्रणात असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.