Breaking News
  • दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी
  • लखलख चमकणारा महाराष्ट्राचा एकमेव काचेचा गणपती पुण्यात!
  • धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम
  • मराठा बांधवांचा मुंबईकडे ‘गनिमी कावा’; धाराशिवमधून 5 हजार कार्यकर्ते जाणार
  • शिरूरमध्ये कांदा लागवडीला वेग; महिलांनी पावसासाठी घातले साकडे
  • मनोज जरांगे पाटील यांचा पाटोदा येथे पहिला मुक्काम; सात लाख मराठा बांधवांसाठी जेवणाची व्यवस्था
  • सुरगाणा तालुक्यातील शासकीय रुग्णालयात सोनोग्राफी मशीन दाखल
  • अनेकांना कुणबी प्रमाणपत्र दिले - एकनाथ शिंदे
  • नांदेडच्या किनवट तालुक्यातील इस्लापूर शहर कडकडीत बंद

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चोऱ्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता

PI Vishnukant Guthhe: राज्यात आणि जिल्ह्यात यंदा पाऊस कमी झाल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत भुरट्या चोऱ्या आणि मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता


दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चोऱ्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता

PI Vishnukant Guthhe |

 

पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे यांचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

हिंगोली (PI Vishnukant Guthhe) : राज्यात आणि जिल्ह्यात यंदा पाऊस कमी झाल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत भुरट्या चोऱ्या आणि मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे (PI Vishnukant Guthhe) यांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. सावध रहा, सुरक्षित रहा, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विहिरीतील पाणी खाली गेल्याने मोटारी उघड्या पडल्या असून मोटार आणि केबल चोरीच्या घटना घडू शकतात. शेतात किंवा आखाड्यावर ठेवलेली पिके, ट्रॅक्टर, मोटारसायकल, शेतीची अवजारे, सोलर पॅनल, बॅटरी तसेच घरातील दागिने, रोकड रक्कम आणि मोबाईल चोरीची शक्यताही वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी विहिरीतील मोटार वापर झाल्यानंतर लगेच वर काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावी, उघड्यावर ठेवू नये, मोटारीला लोखंडी जाळीचे कुलूप लावावे आणि केबल अस्ताव्यस्त ठेवू नये. शेतातील साहित्य रात्रभर उघड्यावर ठेवू नये, सोलर पॅनल व बॅटरी वेल्डिंग करून लोखंडी फ्रेममध्ये लॉक करावीत, कापूस, सोयाबीन, तूर यांच्या गोण्या शेतात रात्रभर ठेवू नयेत आणि आखाड्यावर एकटे झोपण्याऐवजी दोन-तीन जणांनी पाळीने पहारा द्यावा.

जनावरे शेतात मोकळी बांधू नयेत, गोठ्याला मजबूत दरवाजा आणि कुलूप लावावे, रात्री जनावरांच्या गळ्यात घंटी किंवा घुंगरू बांधावे जेणेकरून आवाज येईल आणि जनावरांच्या कानातील टॅगची नोंद ठेवावी. घराला कुलूप लावून बाहेर जाताना शेजारी किंवा पोलीस पाटलांना कल्पना द्यावी, मोठी रोकड किंवा सोने-चांदी घरी न ठेवता बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावी, दिवसा गावात येणाऱ्या अनोळखी फेरीवाले, भंगारवाले किंवा साधूच्या वेशातील व्यक्तींची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी.

गावात रात्री अकरा ते पहाटे पाच या वेळेत कोतवाल, पोलीस पाटील आणि ग्राम सुरक्षा दलामार्फत सामूहिक गस्त सुरू ठेवावी, सीसीटीव्ही बसवले असेल तर तो सतत चालू ठेवावा, मोबाईल घराबाहेर चार्जिंगला ठेवू नये. गावाचा व्हॉट्सअप ग्रुप सक्रिय ठेवून संशयित व्यक्ती किंवा वाहनाचा फोटो नंबरसह टाकावा, संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित ११२ डायल करून बीट अंमलदार किंवा ठाणे अंमलदार यांना कळवावे.

आपली शेजारी सुरक्षित शेजारी या संकल्पनेतून प्रत्येकाने किमान दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, त्यातील एक दुकानाच्या शटरकडे तर दुसरा समोरील रस्त्याकडे असावा, गावातील आणि व्यापार पेठेतील सर्व मुख्य रस्ते सीसीटीव्हीच्या निगराणीखाली येतील असे नियोजन करावे. अशा प्रकारे नियोजनात्मक उपाययोजना करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित असून सुरक्षित हिंगोली, सुरक्षित नागरिक, सुरक्षित समाज हीच आमची भूमिका असल्याचे हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे (PI Vishnukant Guthhe) पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांनी म्हटले आहे.

Related to this topic: