मानोरा (Pohradevi Rescue Operation) : तालुक्यातील पोहरादेवी येथे अडचणीत सापडलेल्या एका वानराला वाशिम येथील RRU (Rapid Rescue Unit) टीमने तातडीने धाव घेत सुरक्षितपणे रेस्क्यू केले. ही घटना आज दिनांक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पोहरादेवी परिसरात एक वानर जखमी अवस्थेत किंवा धोकादायक स्थितीत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. माहिती मिळताच वाशिम वन विभागाच्या रॅपिड रेस्क्यू युनिट (RRU) टीमने घटनास्थळी धाव घेतली आणि शास्त्रोक्त पद्धतीने वानराला पकडून त्याची सुटका केली. रेस्क्यू करण्यात आलेल्या वानरावर प्रथमोपचार करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे.
रेस्क्यू मोहिमेत सहभागी
या (Pohradevi Rescue Operation) संपूर्ण रेस्क्यू कार्यवाही दरम्यान क्षेत्र सहाय्यक, मानोरा, वनरक्षक अनिल राठोड, पी. आर. वानखेडे, पी. के. बर्गे व एस. डब्ल्यू. नाटकर उपस्थित होते. वन विभागाच्या या तत्पर कार्यवाहीचे पोहरादेवी परिसरातील नागरिकांनी आणि वन्यप्रेमींनी कौतुक केले असून, वन्यजीवांच्या संरक्षणासाठी RRU टीम नेहमीच सज्ज असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.
पोहरादेवी रेस्क्यू ऑपरेशन
पोहरादेवी येथे वानराचे यशस्वी रेस्क्यू; आर आर यू टीमच्या तत्परतेमुळे मिळाले जीवदान!
Pohradevi Rescue Operation: तालुक्यातील पोहरादेवी येथे अडचणीत सापडलेल्या एका वानराला वाशिम येथील RRU (Rapid Rescue Unit) टीमने तातडीने धाव घेत सुरक्षितपणे रेस्क्यू केले.
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Pohradevi Rescue Operation
टैग्स:
Pohradevi Rescue Operation