कोरची (PM Micro Food Processing Yojana) : तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कोरची यांच्या वतीने आज दिनांक ९ सप्टेंबर २०२६ रोजी 'प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना' (PMFME) अंतर्गत एकदिवसीय तालुकास्तरीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत तालुक्यातील शेतकरी आणि नवउद्योजकांना कृषी प्रक्रिया उद्योगातील विविध संधी व शासकीय अनुदानाविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी नागेश मिसाळ यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी पारंपरिक शेतीला अन्न प्रक्रियेची जोड दिल्यास शेतीमाल मूल्यवर्धन होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होईल, असे विचार मांडले.
त्यानंतर प्रभारी मंडळ कृषी अधिकारी ज्ञानेश्वर मसराम यांनी पीपीटी (PPT) सादरीकरणाच्या माध्यमातून (PM Micro Food Processing Yojana) योजनेची सविस्तर माहिती दिली. यामध्ये सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग कसा उभारावा, बँकेचे कर्ज, मिळणारे शासकीय अनुदान आणि आवश्यक कागदपत्रे याविषयी शेतकऱ्यांना तांत्रिक व प्रशासकीय मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपकृषी अधिकारी ईश्वरदयाल पाथोडे यांनी केले. या कार्यशाळेला सहाय्यक कृषी अधिकारी, कर्मचारी तसेच कोरची तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना
कोरची येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेवर तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न
PM Micro Food Processing Yojana: तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कोरची यांच्या वतीने आज दिनांक ९ सप्टेंबर २०२६ रोजी 'प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना' (PMFME) अंतर्गत एकदिवसीय तालुकास्तरीय
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
PM Micro Food Processing Yojana