हिंगोली (Petrol pump murder case) : वसमत तालुक्यातील कुरूंदा पोलिस ठाणे हद्दिमध्ये इंडीयन ऑईल कंपनीचे मॅनेजर महेश अण्णाराव शेळके (३७) रा. केळव ता. अहमदपूर जि. लातूर यांचा ६ ऑक्टोंबर रोजी भरदिवसा खुन करण्यात आला होता. या प्रकरणाचा केंद्रीय मंत्र्यांनी दखल घेतली. त्यामुळे पोलिस यंत्रणेने तपासचक्र फिरवून २६ तासात गुन्ह्यातील पाच आरोपींना अटक केली. वसमत तालुक्यातील चोंढी स्टेशन येथील साई उमेश पेट्रोल पंपावर पेट्रोल पंप चालविण्याच्या वादातून ६ ऑक्टोंबरला भर दिवसा खंजीराने वार करून हत्या करण्यात आली होती.
या (Petrol pump murder case) प्रकरणात कुरूंदा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनास्थळी पोलिस अधिक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांच्यासह इतर अधिकार्यांनी भेटी दिल्या होत्या. या प्रकरणाची केंद्रीय पेट्रोल मंत्री हरदिपसिंह पुरी यांनी गंभीररितीने दखल घेऊन दोषींवर जलद व कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यावरून पोलिसांनी तपासचक्र फिरवले.
यामध्ये श्रावण गंगाराम वाकुडे रा. बोबडे टाकळी जि. परभणी ह.मु. गोविंद नगर वसमत, लता साहेब पांडवीर, उमेश साहेबराव पांडवीर रा. नालेगाव ता. औंढा ना. ह.मु. हर्ष नगर वसमत, राहूल उत्तमराव धायजे रा. हर्ष नगर वसमत, प्रथमेश विक्रम वाघमारे रा. सम्राट कॉलनी वसमत या पाच आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.
पेट्रोल पंप खुन प्रकरण
पेट्रोल पंपावरील खुन प्रकरणात केंद्रीय मंत्र्यांनी दखल घेतल्यानंतर पाच आरोपी अटकेत
Petrol pump murder case: समत तालुक्यातील कुरूंदा पोलिस ठाणे हद्दिमध्ये इंडीयन ऑईल कंपनीचे मॅनेजर महेश अण्णाराव शेळके (३७) रा. केळव ता. अहमदपूर जि. लातूर यांचा भरदिवसा खुन करण्यात आला होता...
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Petrol pump murder case
टैग्स:
Petrol pump murder case
संबंधित सामग्री
पेट्रोल पंपाच्या वादातुन चोंडीत खंजीराने एकाची हत्या, पाच आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
Petrol pump murder case: वसमत तालुक्यातील चोंडी स्टेशन येथील साई उमेश पेट्रोलपंपावर पेट्रोलपंप चालविण्यावरून झालेल्या वादाचा रक्तरंजित शेवट झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली.
Oct 07, 2026