Peace Committee Meeting

गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवा; ‘डीजे’ला फाटा द्या!

कळमनुरीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक झाली. पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यासह ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी डीजेचा वापर न करण्याचे आवाहन केले.

गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवा; ‘डीजे’ला फाटा द्या!

Peace Committee Meeting

पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या अध्यक्षतेखाली कळमनुरीत शांतता समितीची बैठक

कळमनुरी : आगामी गणेशोत्सव तसेच इतर सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शांतता, सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा कायम राहावा, यासाठी येथील तहसील कार्यालयात ११ सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक घेण्यात आली.

या बैठकीला गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी, मौलाना, पोलीस पाटील, शांतता समितीचे सदस्य, तसेच प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी सण-उत्सवांच्या काळात निर्माण होणाऱ्या संभाव्य अडचणी, कायदा-सुव्यवस्था तसेच आवश्यक उपाययोजनांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी मौलाना करीमोदिन यांनी गणेशोत्सवाच्या काळात वीजपुरवठा खंडित होऊ नये, अशी मागणी केली. उत्सवाच्या काळात अखंडित विद्युतपुरवठा राहिल्यास मंडळांना तसेच नागरिकांना मोठी सुविधा होईल, असे त्यांनी सांगितले. नंदकिशोर तोष्णीवाल यांनीही विविध उपाययोजना व सूचना मांडल्या. गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील उत्सव आयोजनासंदर्भातील आपल्या समस्या व अडचणी प्रशासनासमोर मांडल्या.

बैठकीत मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी गणेश मंडळांनी ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी डीजेचा वापर टाळावा, असे स्पष्ट आवाहन केले. मोठ्या आवाजामुळे ध्वनिप्रदूषणासह नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे उत्सव साजरा करताना कायद्याचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

गणेश मंडळांनी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना किंवा समस्या निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. पोलीस प्रशासनाकडून उत्सव काळात परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार असून, कायद्याची पायमल्ली करणाऱ्यांविरुद्ध कठोर भूमिका घेतली जाईल, असा इशाराही पोलीस अधीक्षक लोढा यांनी दिला. शांततेत, उत्साहात आणि सामाजिक सलोखा राखून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले.

या बैठकीला पोलीस उपअधीक्षक नारायण देशमुख, तहसीलदार जीवककुमार कांबळे, पोलीस उपअधीक्षक मयूर रसाळ, फौजदार मदन गव्हाणे, संदीप मोदे, शरद मरे, नदीम रजवी आदी उपस्थित होते.

शांतता समितीची बैठक यशस्वी करण्यासाठी लक्ष्मीकांत माखणे, नामदेव कोटकर, गजानन होळकर, विलास बांगर यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

संबंधित सामग्री

CJP नेत्यांच्या अटकेवरून राहुल गांधी आक्रमक; शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकारावरून केंद्रावर हल्लाबोल

CJP नेत्यांच्या अटकेवरून राहुल गांधी आक्रमक; शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकारावरून केंद्रावर हल्लाबोल

Rahul Gandhi: दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनावरून सुरू झालेला वाद आता राजकीयदृष्ट्या अधिक तीव्र झाला आहे. कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या दोन नेत्यांना अटक करून तिहार तुरुंगात पाठवण्यात आले..

Oct 14, 2026
नवरात्रीच्या परंपरेचे कारण देत मृत बाळापासून दूर राहिले आई-वडील; स्मशानभूमी कर्मचाऱ्यांनी केला अंत्यविधी

नवरात्रीच्या परंपरेचे कारण देत मृत बाळापासून दूर राहिले आई-वडील; स्मशानभूमी कर्मचाऱ्यांनी केला अंत्यविधी

छत्रपती संभाजीनगरमध्ये नवरात्रीच्या परंपरेचे कारण देत आई-वडिलांनी मृत बाळाला स्पर्श केला नाही. स्मशानभूमी कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत अंत्यविधी केला.

Oct 14, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! दिवाळीपूर्वी खात्यात जमा होणार 5 हजार रुपये

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! दिवाळीपूर्वी खात्यात जमा होणार 5 हजार रुपये

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजार रुपये मिळणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; कर्जमाफीची प्रक्रियाही सुरू.

Oct 14, 2026
गडचिरोली आश्रमशाळेत १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू; सुट्टी नाकारल्याचा पालकांचा आरोप, चौकशीचे आदेश

गडचिरोली आश्रमशाळेत १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू; सुट्टी नाकारल्याचा पालकांचा आरोप, चौकशीचे आदेश

गडचिरोलीच्या सोनसरी आश्रमशाळेत १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू. सुट्टी नाकारल्याचा पालकांचा आरोप; मंत्री अशोक उईके यांनी चौकशीचे आश्वासन दिले.

Oct 13, 2026
पंजाबमध्ये ड्रग्जविरोधात आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या; फेसबुक लाइव्हमध्ये थरारक घटना कैद

पंजाबमध्ये ड्रग्जविरोधात आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या; फेसबुक लाइव्हमध्ये थरारक घटना कैद

पंजाबच्या मानसात नशाविरोधी कार्यकर्ते परविंदर सिंह झोटा यांची हत्या. मेडिकल स्टोअर मालक आरोपी फरार; घटनेनंतर भगवंत मान सरकारवर विरोधकांची टीका.

Oct 13, 2026