Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

ग्रामपंचायत अधिकारी मृत्यू प्रकरण

सुरक्षेच्या कारणास्तव ग्रामसभांच्या कामकाजावर बहिष्काराचे पातूर येथे निवेदन

Gram Panchayat Officer Death Case: जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे येथे ग्रामसभेदरम्यान ग्रामपंचायत अधिकारी पी. एन. पाटील यांच्यासोबत घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर..


सुरक्षेच्या कारणास्तव ग्रामसभांच्या कामकाजावर बहिष्काराचे पातूर येथे निवेदन

Gram Panchayat Officer Death Case |

पातूर (Gram Panchayat Officer Death Case) : जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे येथे ग्रामसभेदरम्यान ग्रामपंचायत अधिकारी पी. एन. पाटील यांच्यासोबत घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनने (डीएनई-१३६) १८ ऑगस्ट २०२६ पासून ग्रामसभांच्या सचिव पदाच्या कामकाजातून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात संघटनेच्या वतीने पातूर पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

ग्रामसभेत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत योग्य त्या उपाययोजना व्हाव्यात, अशी भूमिका या वेळी मांडण्यात आली.
निवेदनातील मुख्य बाबी:

कामावर बहिष्कार: अकोला जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये आयोजित होणाऱ्या ग्रामसभांमध्ये ग्रामपंचायत अधिकारी 'ग्रामसभेचे सचिव' म्हणून कामकाज पाहणार नाहीत. * प्रशासनाला सहकार्याची भूमिका: प्रशासनाला सहकार्य करण्याची युनियनची तयारी असली तरी सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा असल्याने, तोपर्यंत पातूर तालुक्यातील ग्रामसभांसाठी इतर विभागांतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनाची प्रत पातूरचे तहसीलदार व युनियनच्या जिल्हा शाखेलाही माहितीसाठी सादर करण्यात आली आहे.

Related to this topic: