परभणी तरुण गळफास

परभणीत बंजारा आरक्षण मागणीसाठी तरुणाने घेतला गळफास

Parbhani Youth Suicide: बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना जिंतूर तालुक्यातील केहाळ तांडा येथे घडली.

परभणीत बंजारा आरक्षण मागणीसाठी तरुणाने घेतला गळफास

Parbhani Youth Suicide

 

जिंतूर तालुक्यातील केहाळ तांडा येथील घटना
खिशात सुसाईड नोट आढळल्याची माहिती

जिंतूर (Parbhani Youth Suicide) : बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना जिंतूर तालुक्यातील केहाळ तांडा येथे घडली. मयताच्या खिशात सुसाईड नोट आढळल्याची माहिती आहे.

विजय प्रल्हाद चव्हाण वय ३६ वर्ष, असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. विजय चव्हाण हा शेती व्यवसाय करत होता. पत्नी, मुलगी, दोन मुले असा परिवार असलेल्या विजय चव्हाण याच्यावर मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी होती. बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळाल्यास मुलांना नौकरीच्या संधी उपलब्ध होतील, अशी आशा त्यांना होती. मुलगी पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असल्याने आरक्षणाच्या प्रश्नावरुन ते मागील काही महिन्यापासून व्यथित होते, असे कुटूंबीयांनी सांगितले. मंगळवारी दुपारी शेतात गेल्यावर त्यांनी (Parbhani Youth Suicide) गळफास घेत जीवन संपविले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना जिंतूर येथील शासकीय रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. सपोनि. दत्तात्रय गुंगाणे यांनी पंचनामा केला. 

विजय चव्हाण याच्या खिशात चिठ्ठी आढळल्याची माहिती असून त्यात बंजारा समाजाला आरक्षण न मिळाल्याने आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख असल्याचे तक्रारीत नमूद आहे. जिंतूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पोनि. नामदेव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. दत्तात्रय गुंगाणे तपास करत आहेत.