परभणी पाणीपुरवठा संकट

परभणीत मेन रायझिंग लाईनच्या व्हॉल्व्हमधून लाखो लिटर पाणी वाया!

Parbhani Water Supply Crisis: एकीकडे संभाव्य दुष्काळाचे संकट गडद होत असताना दुसरीकडे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येलदरी येथून येणाऱ्या मुख्य रायझिंग लाईनवरील व्हॉल्व्हमधून लाखो लिटर पाणी वाया

परभणीत मेन रायझिंग लाईनच्या व्हॉल्व्हमधून लाखो लिटर पाणी वाया!

Parbhani Water Supply Crisis

 

जिंतूर रोड बायपास परिसरातील घटना;
तीन तासांनंतर मनपा कर्मचाऱ्यांकडून दुरुस्ती, भाजप नगरसेवकांची पाहणी करून कारवाईची मागणी

परभणी (Parbhani Water Supply Crisis) : एकीकडे संभाव्य दुष्काळाचे संकट गडद होत असताना दुसरीकडे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येलदरी येथून येणाऱ्या मुख्य रायझिंग लाईनवरील व्हॉल्व्हमधून लाखो लिटर पाणी वाया गेल्याची घटना गुरुवारी, २९ ऑक्टोबर रोजी सकाळी जिंतूर रोडवरील बायपास परिसरात घडली. सकाळी ८ वाजता सुरू झालेली पाण्याची गळती तब्बल तीन तासांनंतर, सकाळी ११ वाजता थांबविण्यात आली. या प्रकारामुळे परभणी महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी भाजप नगरसेवकांनी केली आहे.

परभणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येलदरी येथून येणाऱ्या मुख्य रायझिंग लाईनवरील व्हॉल्व्हमधून लाखो लिटर पाणी वाया गेल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी जिंतूर रोडवरील बायपास परिसरात उघडकीस आला. सकाळी ८ वाजेच्या सुमारास व्हॉल्व्हमधून पाण्याची गळती सुरू झाली. मात्र, सकाळी ११ वाजेपर्यंत दुरुस्तीसाठी महानगरपालिकेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप करण्यात आला. अखेर ११ वाजण्याच्या सुमारास मनपा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन गळती दुरुस्त केली.

या (Parbhani Water Supply Crisis) घटनेची माहिती मिळताच भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक विश्वजीत बुधवंत, डॉ. केदार खटिंग, गणेश टाक, रितेश जैन झाबंड, अद्वैत पार्डीकर, जिजाभाऊ थोरात, शंकर आजेगावकर, श्रीपाद दैठणकर आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी पाणीपुरवठा विभागाने सतर्क राहावे, अशी सक्त ताकीद संबंधित अभियंत्यांना दिल्याचे भाजप मनपा सदस्यांनी  सांगितले.

जेसीबीच्या धक्क्याने व्हॉल्व्हला गळती?

या (Parbhani Water Supply Crisis) प्रकरणी महानगरपालिकेचे अभियंता बेग यांच्याशी संपर्क साधला असता, संबंधित व्हॉल्व्हच्या परिसरात प्लॉटिंगचे काम सुरू असून, तेथे काम करणाऱ्या जेसीबीचा धक्का लागल्याने व्हॉल्व्हला गळती लागल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेचा स्पॉट पंचनामा करून अहवाल तयार करण्यात आल्याची माहितीही त्यांनी ‘देशोन्नती’ला दिली. दरम्यान, महानगरपालिकेच्या जलवाहिनीचे नुकसान करून लाखो लिटर पाणी वाया जाण्यास कारणीभूत ठरणाऱ्यांवर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या नगरसेवकांनी केली आहे. संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा यंत्रणेची नियमित तपासणी करून अशा प्रकारांना आळा घालण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.