Parbhani Truck-Tipper Fire: सिमेंटने भरलेला ट्रक आणि टिप्परमध्ये जोरदार धडक झाल्यानंतर लागलेल्या आगीत दोन्ही वाहने जळून खाक झाली. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नसून दोन्ही गाड्यांचे चालक जखमी
वसमत रोडवरील त्रिधारा पाटीजवळील घटना; दोन्ही वाहन चालक जखमी
परभणी (Parbhani Truck-Tipper Fire) : सिमेंटने भरलेला ट्रक आणि टिप्परमध्ये जोरदार धडक झाल्यानंतर लागलेल्या आगीत दोन्ही वाहने जळून खाक झाली. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नसून दोन्ही गाड्यांचे चालक जखमी झाले आहेत. ही घटना बुधवार २६ ऑगस्ट रोजी पहाटे पाचच्या सुमारास वसमत रोडवरील त्रिधारा पाटी पुलाजवळ घडली.
या (Parbhani Truck-Tipper Fire) घटनेविषयी अधिक माहिती अशी की, एम.एच. ३४ बी.झेड. १८९७ या क्रमांकाचा ट्रक सिमेंट घेऊन परभणीकडे येत होता. तर एमएच ४३ यु. ७६०८ या क्रमांकाचा टिप्पर राहटीकडे जात असताना त्रिधारा पाटीजवळील पुलावर दोन्ही वाहनांचा अपघात झाला. अपघातानंतर वाहनांनी पेट घेतला. पहाटेच्या वेळी त्रिधाराकडे दर्शनासाठी जाणार्या नागरीकांनी दोन्ही वाहनातील चालकांना वेळीच बाहेर काढले. घटनेची माहिती परभणी अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन अधिकारी दिपक कानोडे, फायरमन निखिल बेंडसुरे, मदन जाधव, वाहन चालक वसीम अखिल अहेमद यांनी घटनास्थळी धाव घेत आग अटोक्यात आणली. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक रमेश कांबळे, किशोर जाधव जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी परभणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.