२२ वर्षीय विवाहितेची पोलिसात धाव
मुस्लिम महिला कायद्यासह बीएनएसअंतर्गत कारवाई
जिंतूर (Parbhani Triple Talaq Case) : कौटुंबिक वादातून मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आणि त्यानंतर तीन वेळा तलाक म्हटल्याचा गंभीर आरोप विवाहीतेने पतीविरोधात जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
२२ वर्षीय विवाहितेचा २०२२ मध्ये जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील अहमदपूरा येथील शेख सोहेल याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर सासरच्या मंडळींकडून मानसिक व शारीरिक छळ होत असल्याचा आरोप विवाहितेने केला आहे. १४ ऑक्टोबर रोजी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी विवाहितेने पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे अकराच्या सुमारास संतप्त पती माहेरी आला. यावेळी त्याने विवाहीत महिलेला मारहाण करून तीन वेळा तलाक म्हटल्याचा आरोप पीडितेने फिर्यादीत केला आहे. या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.