परभणी एसटी कर्मचारी आंदोलन

परभणीत प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचार्‍यांचे घंटानाद आंदोलन....!

Parbhani ST Employees' Protest: महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने प्रलंबित आर्थिक व सेवाविषयक मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पाथरी आगारासमोर कर्मचार्‍यांचा घंटानाद आंदोलन..

परभणीत प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचार्‍यांचे घंटानाद आंदोलन....!

Parbhani ST Employees' Protest

 

पाथरी तालुक्यातील एस टी. आगारासमोर आंदोलन
मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा...!

पाथरी (Parbhani ST Employees' Protest) : महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने प्रलंबित आर्थिक व सेवाविषयक मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवार ३ नोव्हेंबर रोजी पाथरी आगारासमोर कर्मचार्‍यांनी घंटानाद आंदोलन केले. दुपारी १२ ते १ या वेळेत झालेल्या या आंदोल नात कर्मचार्‍यांनी घंटानाद करून आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.

कामगारांच्या प्रलंबित आर्थिक प्रश्नांवर वारंवार पाठपुरावा करूनही समाधानकारक तोडगा निघत नसल्याने संघटनेने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. (Parbhani ST Employees' Protest) आंदोलनाच्या दुसर्‍या टप्प्यात बुधवार ४ नोव्हेंबर रोजी द्वारसभा व निदर्शने करण्यात येणार आहेत. त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास गुरुवार ५ नोव्हेंबरपासून राज्यभर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.