अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांचा निकाल आरोपीस ३० हजाराचा दंड...!
परभणी (Parbhani sister-in-law assault case) : वडिलांची वाट बघत दुकानासमोर थांबलेल्या महिलेला मावस बहिणीच्या नवर्याने कोयत्याने मारुन जखमी केले होते. या प्रकरणात अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम.डी. गौतम यांनी आरोपी गणेश नामदेवराव कुलदिपके याला दोषी ठरवत तीन वर्ष सश्रम कारावास आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सदर प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता व्ही.के. पोटफोडे यांनी बाजू मांडली.
या बाबत अधिक माहिती अशी की, ३ ऑगस्ट २०२० रोजी जखमी महिलेने शासकीय रुग्णालय येथे जबाब दिला होता. महिला काम करत असलेले दुकान बंद झाल्याने ती दुकानासमोर वडिलांची वाट पाहत थांबली होती. यावेळी मावस बहिणीचा नवरा गणेश कुलदिपके दुकानासमोर आला. त्याने फिर्यादीला तु माझ्या सोबत लग्न का करत नाहीस, असे म्हणत असे म्हणत शिवीगाळ करुन गालात चापट मारली. बाजुच्या दुकानातील मुलगा भांडण सोडविण्यास आला असता आरोपीने त्याच्या जवळील कोयता काढून फिर्यादीच्या हातावर, पोटरीवर वार करत जखमी करुन पळ काढला. या प्रकरणी नानलपेठ पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला. सपोनि. कल्पना राठोड यांनी तपास करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सरकार पक्षातर्पेâ दहा साक्षीदार तपासण्यात आले. सुनावणी अंती न्यायाधीश एम.डी. गौतम यांनी आरोपीला दोषी ठरविले. मारहाण प्रकरणात दोन वर्ष सश्रम कारावास १५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना कारावास, शस्त्र अधिनियमान्वये तीन वर्ष सश्रम कारावास १५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोउपनि. सुरेश चव्हाण, पोलीस अंमलदार वंदना आदोडे, बी. बी. जवादे यांनी काम पाहिले.