परभणी फेरफार नक्कल

परभणीत फेरफार नक्कलसाठी शेतकरी रांगेत...!

Parbhani Mutation Extract: सेलू तालूक्यातील अनेक शेतकरी राज्य सरकारच्या अहिल्याबाई होळकर कर्जमूक्ती योजनेत पात्र झाले. दरम्यान बँकाकडून कागदपत्रांची मागणी केली जात असल्याने शेतकरी फेरफारसाठी...

परभणीत फेरफार नक्कलसाठी शेतकरी रांगेत...!

Parbhani Mutation Extract

 

दोन दिवसापासून तहसिल कार्यालयात विजेचा लपंडाव; कामे खोळंबली

परभणी (Parbhani Mutation Extract) : सेलू तालूक्यातील अनेक शेतकरी राज्य सरकारच्या अहिल्याबाई होळकर कर्जमूक्ती योजनेत पात्र झाले. दरम्यान बँकाकडून कागदपत्रांची मागणी केली जात असल्याने शेतकरी फेरफारसाठी तहसील कार्यालयातील फेरफार विभागात चकरा मारत असून दोन दिवसापासून विजेच्या लंपडावामूळे कर्मचार्‍यांसह शेतकरी त्रस्त झाले आहेत. 

अहिल्याबाई होळकर कर्जमूक्ती योजनेत शेतकर्‍यांना कर्जमूक्ती झाली मात्र कागदपत्र मिळण्याच्या अडचणीमूळे सदरील योजनेत शेतकर्‍यांना पिककर्ज मिळण्यास विलंब होत आहे. नविन पिककर्ज मिळण्यासाठी बँक शेतकर्‍यांकडून सातबारा,नमूना नं.८,तर तहसील कार्यालयातून फेरफार नक्कल तसेच इतर कागदपत्रे जमा केल्या नंतरच पिककर्जाच्या संचिकेवर शेतकर्‍यांना स्वाक्षर्‍या करण्यासाठी बोलावले जाते. परंतू फेरफार मिळण्यासाठी शेतकर्‍यांना विजेचा अडसर कारणीभूत ठरत आहे. 

विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यास नक्कल उपलब्ध होईल- महसुल प्रशासन
दोन दिवसापासून तहसिल कार्यालयात विजेचा लपंडाव सूरू असल्याने फेरफार सह,जातीचे प्रमाणपत्र,उत्पन्न प्रमाणपत्र,डोमासाईल,व इतर कागदपत्रे मिळण्यासाठी त्रासाचा सामना करावा लागत आहे.दरम्यान विद्यूत पूरवठा सूरळीत झाल्यास तात्काळ शेतकर्‍यांना फेरफार नक्कल तात्काळ उपलब्ध करून दिली जाईल असे महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.