परभणी मनपा आंदोलन

परभणी मनपा कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन दुपार नंतर मागे

Parbhani Municipal Corporation Protest: लेखी आश्वासन देवूनही पुर्तता न केल्याने महापालिका कर्मचार्‍यांनी सोमवार २ नोव्हेंबर पासून कामबंद आंदोलन पुकारले होते. यानंतर प्रशासनाने संप काळातील वेतन..

परभणी मनपा कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन दुपार नंतर मागे

Parbhani Municipal Corporation Protest

 

दिवाळीपूर्वी कर्मचार्‍यांच्या खात्यावर दोन वेतन टाकण्याचे आश्वासन

परभणी (Parbhani Municipal Corporation Protest) : लेखी आश्वासन देवूनही पुर्तता न केल्याने महापालिका कर्मचार्‍यांनी सोमवार २ नोव्हेंबर पासून कामबंद आंदोलन पुकारले होते. यानंतर प्रशासनाने संप काळातील वेतन, थकीत दोन महिन्याचे वेतन, सेवानिवृत्ती वेतन आदी देयक दिवाळी पूर्वी अदा करण्याचे आश्वासन दिल्याने दुपारनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

परभणी शहर महापालिका अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी २८ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत कामबंद आंदोलन केले होते. त्यानंतर तडजोडी प्रमाणे मनपा प्रशासनाने लेखी आश्वासन दिले. मात्र या आश्वासनाची पुर्तता केली नाही. त्यानंतर आक्रमक झालेल्या कर्मचार्‍यांनी २ नोव्हेंबर पासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. सोमवारी सकाळी आंदोलनाला सुरुवात झाली.

ऐन दिवाळीत कर्मचार्‍यांनी आंदोलन सुरू केल्याने शहराची स्वच्छता व इतर मुलभूत सुविधांचा प्रश्न उभा टाकणार होता. या सर्व बाबी लक्षात घेता मनपा प्रशासनाने मध्यस्थी करत संप काळातील वेतन, थकीत वेतन, सेवानिवृत्ती वेतन आदी दिवाळी पूर्वी देण्याचे संघटनेला आश्वासन दिले. या आश्वासनानंतर कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले आहे, अशी माहिती कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.