Parbhani Kavad Yatra: श्रावण महिण्या निमित्त शिवसेनेच्या वतीने ३१ ऑगस्ट रोजी कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.या यात्रेसंदर्भात गुरुवार २० ऑगस्ट रोजी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय
यात्रेत शिवभक्तांनी सहभागी व्हावे; जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांच्या उपस्थितीत बैठक
परभणी (Parbhani Kavad Yatra) : श्रावण महिण्या निमित्त शिवसेनेच्या वतीने ३१ ऑगस्ट रोजी कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.या यात्रेसंदर्भात गुरुवार २० ऑगस्ट रोजी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
श्री क्षेत्र त्रिधारा देवस्थान येथुन यात्रेला सुरुवात होईल.वसमत रोड,छत्रपती शिवाजी महाराज चौक, मृत्यूंजय पारदेश्वर मंदिर परिसरातून पुढे जात बेलेश्वर महादेव मंदिर येथे जलाभिषेक करुन यात्रेचा समारोप होणार आहे. यात्रेच्या मार्गावर विविध ठिकाणी आकर्षक रांगोळया, फटाक्यांनी आतिषबाजी, देखावे, आकर्षक डिजे,तसेच शिवभक्तांच्या स्वागतासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा.श्रीकांत शिंदे, खा.संजय जाधव यांच्या मागदर्शनाखाली कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
यात्रे संदर्भात आयोजीत नियोजन बैठकीला जिल्हा प्रमुख गिताताई सुर्यवंशी, सखुबाई लटपटे, सुशिला चव्हाण, डॉ.मदन लांडगे, मानिक पोंढे,महादेव खुने, बाळासाहेब पानपट्टे, सचिन पाटील, अशोक गव्हाणे, रामप्रसाद रन्हेर, प्रदिप भालेराव, शेखर सवंडकर, राहुल ठाकुर,प्रविन टेकाळे, शब्बीर भाई, शहाणे, राम कुलथे, राजकुमारसिंह टाक, राम जावळे, बाळासाहेब साबळे, दिपक शिंदे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शाखाप्रमुख, युवासेना पदाधिकारी, कर्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.