परभणी जायकवाडी धरण

परभणीत जायकवाडी धरणातून पिण्यासाठी, रब्बी पिकांसाठी आवर्तने द्या

Parbhani Jayakwadi Dam: मराठवाड्यातील चार्‍याचा, पिण्याचा पाण्याचा व अन्नधान्याचा प्रश्न मिटवण्यासाठी जायकवाडी धरणातून पिण्यासाठी, रब्बी पिकांसाठी आवर्तन द्या: आ. राजेश विटेकर, आ. डॉ. रत्नाकर गुट्टे

परभणीत जायकवाडी धरणातून पिण्यासाठी, रब्बी पिकांसाठी आवर्तने द्या

Parbhani Jayakwadi Dam

 

आ. राजेश विटेकर, आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी 

परभणी (Parbhani Jayakwadi Dam) : मराठवाड्यातील चार्‍याचा, पिण्याचा पाण्याचा व अन्नधान्याचा प्रश्न मिटवण्यासाठी जायकवाडी धरणातून पिण्यासाठी, रब्बी पिकांसाठी आवर्तन द्या अशी मागणी आ.राजेश विटेकर, आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

जायकवाडीचे (Parbhani Jayakwadi Dam) पाणी परभणी जिल्ह्यासाठी वरदान ठरणार आहे. या पाण्यावर जे शेतकरी चारा पीके घेतील त्या शेतकर्‍यांचा चारा राज्य सरकार मार्फत हमी भावाने सरकारने खरेदी करण्याचे जाहीर केले आहे. जर पाण्याच्या नियोजनाने परभणी जिल्ह्यात ज्वारी व चारा पिके चांगली आली तर हा चारा दुष्काळी बीड, धाराशिव, लातूर या नजीकच्या जिल्ह्यांना पोहोचवणे सोयीचे ठरेल, प्रमाणे दळण-वळणाचा खर्च निश्चित वाचेल. यासाठी तात्काळ कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन आवर्तनाचे नियोजन करावे अशा सूचना संबंधितांना द्याव्यात अशी मागणी आ राजेश विटेकर, आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

जिल्ह्यात या वर्षी भीषण दुष्काळ पडलेला असून खरीपाची जवळपास सर्वच पिके शेतकर्‍यांच्या हातून गेलेली आहेत. राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना मोठा दिलासा दिला आहे, ही सकारात्मक बाब आहे. यावर्षी मराठवाड्यात दुष्काळ असताना देखील जायकवाडी धरणाच्या उर्ध्व भागात चांगला पाऊस झाल्यामुळे धरण ९० टक्के भरलेले होते. आज स्थितीला धरणामध्ये ७८ टक्के जिवंत साठा उपलब्ध आहे. धरणाच्या डाव्या कालव्यावर परभणी जिल्ह्यातील मानवत, सोनपेठ, पाथरी, परभणी ग्रामीण या तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा स्रोत आहे. त्याचबरोबर डाव्या कालव्यावर परभणी जिल्ह्यातील ९७ हजार हेक्टर सिंचन क्षेत्र ओलीताखाली येते. सोबतच कालव्याची दुरुस्ती व इतर कामे तात्काळ करणे गरजेची आहेत. ती जर वेळेवर केली तर टेल पर्यंत शेतकर्‍यांना पाणी मिळेल. याचे देखील नियोजन दुष्काळी मंत्रिगटाच्या बैठकीमध्ये होणे अपेक्षित आहे.

या (Parbhani Jayakwadi Dam) दुष्काळी परिस्थितीमध्ये रब्बी ज्वारीसाठी व इतर पिकासाठी तसेच जनावरांच्या  चार्‍यांसाठी ३ आवर्तने सोडण्याचे नियोजन केले तर जायवाडीच्या लाभक्षेत्रातील शेतकरी ज्वारी पिक घेऊन जनावराच्या चार्‍याचा प्रश्न मार्गी लावू शकतील. त्याचबरोबर शेतमजुरांचे, कामगारांचे होणारे स्थलांतर ज्वारी पिकामुळे बर्‍याच अंशाने थांबेल. रोजगार मिळेल म्हणून जायकवाडी धरणातून रब्बी ज्वारी आणि चार्‍याच्या पिकाकरिता आवर्तने सोडण्याचे त्याचबरोबर एप्रिल - मे २०२७ या महिन्यात वाढणार्‍या तापमानात पाण्याची टंचाई भासणार आहे. त्याकरिता भविष्यासाठीही  २ रोटेशनचे नियोजन तात्काळ कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन करण्यात यावे.

टैग्स: Parbhani Jayakwadi Dam