परभणी जायकवाडी कालवा

परभणीत जायकवाडीच्या कालव्यातून रब्बी हंगामात चार पाणीपाळ्या....!

Parbhani Jayakwadi Canal: दुष्काळी परिस्थितीमुळे पाथरीसह परभणी जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या पिकांना पाणी पाळ्या देण्यात याव्यात, अशी मागणी आ.राजेश विटेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

परभणीत जायकवाडीच्या कालव्यातून रब्बी हंगामात चार पाणीपाळ्या....!

Parbhani Jayakwadi Canal

 

५ नोव्हेंबरपासून पहिली पाणीपाळी; आ. राजेश विटेकर यांच्या मागणीला यश 

परभणी (Parbhani Jayakwadi Canal) : दुष्काळी परिस्थितीमुळे पाथरीसह परभणी जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या पिकांना पाणी पाळ्या देण्यात याव्यात, अशी मागणी आ.राजेश विटेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत केली होती. या मागणीला यश आले असून पिकासाठी जायकवाडीच्या डाव्या व उजव्या कालव्याद्वारे रब्बी हंगामात चार पाणीपाळ्या देण्यात येणार आहे. याबाबत जलसंपदामंत्री यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. पाच नोव्हेंबरपासून पहिली पाणीपाळी सुरू होणार आहे.

परभणी जिल्ह्यातील डावा व उजव्या कालव्याला (Parbhani Jayakwadi Canal) पाणी सोडण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील मोठे क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शेवटपर्यंत पाणी पोहचण्यासाठी पोलिस संरक्षण सुध्दा करण्यात आल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगीतले. माजलगाव धरणामध्येही पाणी सोडण्यात येणार आहे. जायकवाडी धरणामध्ये उपलब्ध पाण्यामधुन गोदावरी नदीच्या पात्रात असलेल्या सर्व बॅरेजेसमध्ये सुध्दा पाणी भरून घेण्यात येणार आहे.

अलनिनोच्या पार्श्वभूमीवर १३ जून २०२६ च्या शासन पत्रानूसार सिंचनासाठी पाणी सोडण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र जायकवाडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने लोकप्रतिनिधींनी सिंचनासाठी पाणीपाळी सोडण्याची मागणी केली होती.