Parbhani Gutkha Seizure: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पालम पोलीस ठाणे हद्दित कोळवाडी गावाजवळ केलेल्या कारवाईत एका चारचाकी वाहनातून ५ लाख ६३ हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे.
स्थागुशाची पालम पोलीस ठाणे हद्दित कोळवाडी गावाजवळ कारवाई
परभणी (Parbhani Gutkha Seizure) : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पालम पोलीस ठाणे हद्दित कोळवाडी गावाजवळ केलेल्या कारवाईत एका चारचाकी वाहनातून ५ लाख ६३ हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. या कारवाईत एकूण १६ लाख ६३ हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
स्थागुशाचे पोनि. गजेंद्र सरोदे, पोउपनि. चंदनसिंह परिहार, पोलीस अंमलदार महेश कवठाळे, माणिक वाघ, सचिन भदर्गे, दिलीप निलपत्रेवार शेख इम्रान यांच्या पथकाने कारवाई केली. स्थागुशाचे पथक २९ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास गंगाखेड पोलीस उपविभागात गस्तीवर असताना या पथकाला एका पांढर्या रंगाच्या क्रेटा गाडीमध्ये अवैधरित्या गुटखा वाहतूक करुन कोळवाडी गावाकडे घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. यावरुन पोलिसांनी सापळा रचत सदर संशयीत वाहन थांबविले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये विमल, राजनिवास, डायरेक्टर, रजनिगंधा आदी ५ लाख ६३ हजार रुपये किंमतीचा गुटखा आढळून आला. वाहनासह पोलिसांनी १६ लाख ६३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पालम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.