Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी शेतामाल चोरी

परभणीत झरी येथे दोन चोरट्यांना शेतकर्‍यांनी पकडले; विद्युत मोटार केबल, शेतमशागतीचे साहित्य चोरी

Parbhani Farm Produce Theft: तालुक्यातील झरी  येथे केबल, मोटार, शेतीसाहित्य चोरी करतांना दोन चोरट्यांना शेतकर्‍यांनी पकडले. इतर चोरटे अ‍ॅटोतून पसार होण्यात यशस्वी झाले.


परभणीत झरी येथे दोन चोरट्यांना शेतकर्‍यांनी पकडले विद्युत मोटार केबल शेतमशागतीचे साहित्य चोरी

Parbhani Farm Produce Theft |

परभणी ( Parbhani Farm Produce Theft) : तालुक्यातील झरी  येथे केबल, मोटार, शेतीसाहित्य चोरी करतांना दोन चोरट्यांना शेतकर्‍यांनी पकडले. इतर चोरटे अ‍ॅटोतून पसार होण्यात यशस्वी झाले. ही घटना बुधवार १९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली. शेतकर्‍यांनी चोरट्यांना ग्रामीण पोलिसांच्या हवाली केले आहेत. 

सध्या खरीब हंगामातील  शेतीमशागतीचे काम चालू आहे. यासाठी शेतकर्‍यांनी साहित्य शेतात आणून ठेवले आहे. बुधवारी दुपारी २ च्या सुमारास झरी परिसरातील शेतात कापसाच्या पिकामध्ये आठ जण लपून बसले असल्याचे शेतात काम करणार्‍या शेतकर्‍यांच्या लक्षात आले.  (Parbhani Farm Produce Theft) त्यांनी संबंधितांना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी सहा जण अ‍ॅटो घेऊन पसार झाले. तर दोघांना शेतकर्‍यांनी ताब्यात घेतले. त्यांच्या जवळ केबल तोडण्याची पकड, चोरी करण्याचे साहित्य मिळून आले. घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. सपोनि.आडके, पोउपनि मोहिते, बीटजमादार कनाके, शंकर हाके यांच्या स्वाधीन चोरट्यांना करण्यात आले.

Related to this topic: