जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात पोलिस बंदोबस्त
परभणी (Parbhani District and Sessions Court) : बॉम्ब शोधक आणि श्वान पथकाद्वारे तपासणीपरभणी : राज्यातील बहूतांश जिल्हा व सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल सोमवार २ नोव्हेबर रोजी प्राप्त झाला. या मध्ये परभणी जिल्हा व सत्र न्यायालयाचाही समावेश असल्याने संपूर्ण जिल्ह्यात व पोलिस दलात खळबळ उडाली. न्यायालय परिसरात सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास बॉम्ब शोधक पथक, डॉग पथक जिल्हा व सत्र न्यायालय आवारात दाखल झाले. सर्वाना बाहेर काढण्यात आले आहे. दुपारी पावणे चार वाजेपर्यंत कसून तपासणी करण्यात आली. दुपारी पावणे चार नंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
राज्यातील बहूतांश जिल्हा व सत्र न्यायालयाची इमारत बॉम्बने उडवून देण्याची धमकी सोमवार २ नोव्हेंबर रोजी ईमेलद्वारे देण्यात आली होती. परभणी जिल्हा न्यायालयाला सुध्दा बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई मेल मिळाला होता. पोलिसांना ही माहिती मिळताच पोलिस दलाने सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास तातडीने इमारतीचा ताबा घेतला. न्यायालय परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. न्यायालया-तील सर्व वकील, कर्मचारी व नागरीकांना बाहेर काढण्यात आले. डॉग स्कॉड आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी पोहोचले. इमारत व परिसरात कसून तपासणी केली जात आहे.
न्यायालयाचे गेट देखील बंद करण्यात आले आहे आणि त्यामुळे येणार्या जाणार्या प्रत्येकावर लक्ष ठेवले जात होते. परिसरात बघ्यांची गर्दी जमा झाली होती. गर्दीवर पोलिस कर्मचारी नियंत्रण ठेवत होते. नेमके काय घडते याची नागरीकांना काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे सर्वत्र गोंधळ आणि भितीचे वातावरण होते. मात्र पावणे चार वाजेपर्यंत तपासणी केल्यानंतर बॉम्बची केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर कर्मचार्यांना कार्यालयात सोडण्यात आले.