परभणी जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण

परभणीच्या जिल्हाधिकारीपदी आण्णासाहेब चव्हाण

Parbhani Collector Annasaheb Chavan: महात्महा फुले जीवनदायी आरोग्य योजना सोसायटी मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी आण्णासाहेब चव्हाण परभणी जिल्हाधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे.

परभणीच्या जिल्हाधिकारीपदी आण्णासाहेब चव्हाण

Parbhani Collector Annasaheb Chavan

 

जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांची सेवानिवृत्ती

परभणी (Parbhani Collector Annasaheb Chavan) : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण हे नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या जागेवर महात्महा फुले जीवनदायी आरोग्य योजना सोसायटी मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी आण्णासाहेब चव्हाण परभणी जिल्हाधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे. या बाबत सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांच्या स्वाक्षरीने पत्र काढण्यात आले आहेत. 

जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या कार्यकाळात महापालिका निवडणूक, पदवीधर निवडणूक, जिल्हा परिषद स्थानिक संस्था निवडणूक, विधान परिषद निवडणूक पार पडल्या. तसेच त्यांच्या कार्यकाळात मतदार याद्या पुनर्रिक्षण कार्यक्रमात परभणी जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली. नियतवयोमानानुसार संजयसिंह चव्हाण सेवानिवृत्त होत आहेत. रिक्त होणार्‍या जागी पद वरिष्ठ समय श्रेणीत अवनत करुन आण्णासाहेब चव्हाण (Parbhani Collector Annasaheb Chavan) यांची परभणी जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना त्यांच्या जवळील पदभार अनिल भंडारी यांच्याकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार संजयसिंह चव्हाण यांच्याकडून शनिवार ३१ ऑक्टोबर रोजी स्विकारण्याविषयी सूचना देण्यात आल्या आहेत. 

जिल्ह्याचा रेट वाढला !
शासकीय कार्यालयात विविध कामे घेवून नागरीक येतात. सदरची कामे करण्यासाठी मागील वर्षभरात रेट दुप्पटीने वाढला होता, अशी चर्चा ऐकावयास मिळाली. नवीन येणारे जिल्हाधिकारी आणखी भाव वाढवतात की कमी करतात या विषयी बोलले जात आहे.