परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती

परभणीच्या लिमला येथे कापूस खरेदीचा शुभारंभ; ९ हजार ७०१ रुपयांचा उच्चांकी भाव पहिल्याच दिवशी १०० क्विंटल ६४ किलो आवक 

Parbhani Bazar Samiti: कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येत असलेल्या लिमला येथील ‘विराज कोटेक्स’ जिनिंगमध्ये विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर मंगळवार २० ऑक्टोबर रोजी कापूस खरेदीचा शुभारंभ

परभणीच्या लिमला येथे कापूस खरेदीचा शुभारंभ; ९ हजार ७०१ रुपयांचा उच्चांकी भाव पहिल्याच दिवशी १०० क्विंटल ६४ किलो आवक 

Parbhani Bazar Samiti

 

हमीभावापेक्षा जास्त दर मिळाल्याने शेतकरी सुखावले

परभणी/ ताडकळस (Parbhani Bazar Samiti) : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येत असलेल्या लिमला येथील ‘विराज कोटेक्स’ जिनिंगमध्ये विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर मंगळवार २० ऑक्टोबर रोजी कापूस खरेदीचा शुभारंभ सभापती बालाजी रुद्रवार यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी काटा पूजन करून कापसाला तब्बल ९ हजार ७०१ रुपये प्रतिक्विंटल असा उच्चांकी भाव देण्यात आला. पहिल्याच दिवशी सुमारे १०० क्विंटल ६४ किलो कापसाची खरेदी झाली. हमीभावापेक्षा अधिकचा दर मिळाल्याने दुष्काळाच्या छायेत असलेल्या बळीराजाच्या चेहर्‍यावर समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

कार्यक्रमास उपसभापती अंकुशराव शिंदे, संचालक पंडितराव जाधव, अंकुशराव जोगदंड, बाळासाहेब पवार, देवानंद नावकिकर, अजित वरपुडकर, नरहरी रुद्रवार, नंदकिशोर मुंदडा, बापूराव आंबोरे, बाजार समितीचे सचिव शंकर देशमुख, मुंजाभाऊ कुकर, चेअरमन दामोदर शिंदे, जिनिंग मालक रोशन कुमार (चौधरी व अग्रवाल), ग्रेडर रोहित शर्मा, संजय गुंडाळे, गोविंद आवरगंड, गजानन काळे, विठ्ठल शिंदे, पांडुरंग शिंदे, शेख महंमद, रामभाऊ गाडेकर आदींची उपस्थिती होती.                 

सभापतींनी नाकारला सत्कार
यावर्षी पावसाअभावी भिषण दुष्काळाचा सामना शेतकर्‍यांना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना सर्वांनी दिलासा देण्यासाठी प्रयत्नशील राहणारे सभापती बालाजी रुद्रवार यांनी यावेळी जिंनिग मालकाकडून करण्यात येत असलेला सत्कार न स्वीकारता शेतकर्‍यांच्या कापसाला जास्तीत जास्त भाव देऊन त्यांना सन्मानाने वागणुक द्यावी हाच मोठा सत्कार असल्याची प्रतिक्रिया सभापती बालाजी रुद्रवार यांनी दिली.

टैग्स: Parbhani Bazar Samiti