Parbhani Accident

परभणीत कर्तव्यावरून घरी परतणाऱ्या होमगार्डचा अपघाती मृत्यू; अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे ठार

परभणीतील इसाद रोडवरील फुलमळा परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत होमगार्ड दशरथ टोले आणि एका पादचाऱ्याचा मृत्यू; होमगार्ड बालाजी गाडे जखमी.

परभणीत कर्तव्यावरून घरी परतणाऱ्या होमगार्डचा अपघाती मृत्यू; अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे ठार

परभणी/गंगाखेड : तालुक्यातील राणीसावरगाव येथे कर्तव्य बजावून दुचाकीवरून गंगाखेड येथे घरी परतणाऱ्या होमगार्डचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास इसाद रोडवरील फुलमळा परिसरात घडली. अज्ञात वाहनाने दुचाकीला आणि रस्त्याने पायी चालणाऱ्या एका इसमाला जोराची धडक दिल्याने या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, नवरात्र महोत्सवात तालुक्यातील राणीसावरगाव येथे कर्तव्य बजावून दुचाकीवरून गंगाखेड येथे घरी परतणारे होमगार्ड दशरथ रंगनाथराव टोले आणि होमगार्ड बालाजी तुळशीराम गाडे यांची दुचाकी कासारवाडी पाटीजवळील कॅनलच्या पुढे गेल्यानंतर रात्री अंदाजे नऊ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

अज्ञात वाहनाने दुचाकीला तसेच रस्त्याने पायी चालणाऱ्या अंदाजे ४५ वर्षीय इसमाला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील गृहरक्षक दलाचे जवान होमगार्ड दशरथ रंगनाथराव टोले (वय ५० वर्षे, रा. टोले गल्ली, गंगाखेड) आणि पायी चालणाऱ्या अनोळखी इसमाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत होमगार्ड बालाजी तुळशीराम गाडे जखमी झाले.

अपघाताची माहिती समजताच खासगी रुग्णवाहिका चालक रावण भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे उपस्थित नागरिकांच्या मदतीने तिघांना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. आर. चट्टे, परिचारिका पल्लवी माने, सुमेधा नागरगोजे आदींनी त्यांच्यावर उपचार केले. यावेळी दशरथ टोले आणि अनोळखी इसमाला मृत घोषित करण्यात आले.

याप्रकरणी जखमी होमगार्ड बालाजी तुळशीराम गाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कर्तव्य बजावून घराकडे परतणाऱ्या दशरथ रंगनाथ टोले यांच्यावर शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी दुपारी गोदा घाट स्मशानभूमीत सलामी देऊन शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, होमगार्ड जिल्हा समादेशक परमेश्वर जवादे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराज हाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर निलंगे आदी अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित सामग्री

महाराष्ट्राच्या ईराची जागतिक भरारी! 10व्या वर्षी केले सहा विश्वविक्रम

महाराष्ट्राच्या ईराची जागतिक भरारी! 10व्या वर्षी केले सहा विश्वविक्रम

Ira’s Global Ascent: महाराष्ट्रातील बुलढाणा येथील अवघ्या 10 वर्षीय ईरा आदित्य राऊत हिने स्कूबा डायव्हिंगच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत एका दिवसात सहा जागतिक विक्रम नोंदवले आहेत.

Nov 12, 2026
यवतमाळमध्ये भूकंपाचे धक्के! एकलासपूरमध्ये ३ रिश्टर स्केलची नोंद; नागरिकांमध्ये भीती

यवतमाळमध्ये भूकंपाचे धक्के! एकलासपूरमध्ये ३ रिश्टर स्केलची नोंद; नागरिकांमध्ये भीती

यवतमाळच्या एकलासपूरमध्ये ३ रिश्टर स्केलचा भूकंप! नागरिकांमध्ये भीती, सुदैवाने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी नाही.

Nov 09, 2026
दिवाळीच्या फटाक्यांमुळे लातूरमध्ये आगीच्या आठ घटना; ३० जवानांकडून युद्धपातळीवर बचावकार्य

दिवाळीच्या फटाक्यांमुळे लातूरमध्ये आगीच्या आठ घटना; ३० जवानांकडून युद्धपातळीवर बचावकार्य

लातूरमध्ये दिवाळीच्या फटाक्यांमुळे आठ ठिकाणी आग; ३० जवान आणि आठ अग्निशमन वाहनांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

Nov 09, 2026
मानोऱ्यात मनोज जरांगे पाटलांचे जंगी स्वागत; समाजबांधव आणि शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती

मानोऱ्यात मनोज जरांगे पाटलांचे जंगी स्वागत; समाजबांधव आणि शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती

मनोज जरांगे पाटील यांचे मानोरा शहरात आगमन होताच समाजबांधव आणि शेतकऱ्यांनी जंगी स्वागत केले. यावेळी नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

Nov 09, 2026
ठाणे जिल्ह्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी! ९ नोव्हेंबरपासून नवे निर्बंध; ८ जानेवारी २०२७ पर्यंत आदेश लागू

ठाणे जिल्ह्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी! ९ नोव्हेंबरपासून नवे निर्बंध; ८ जानेवारी २०२७ पर्यंत आदेश लागू

दिवाळीतील आगीच्या घटनांनंतर ठाणे जिल्ह्यात रॉकेट फटाक्यांवर बंदी लागू. ९ नोव्हेंबर २०२६ ते ८ जानेवारी २०२७ पर्यंत निर्बंध कायम राहणार.

Nov 09, 2026