पंचायत समिती, मानोरा

दुष्काळात जंगली जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करा; मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे मागणी

Manora Panchayat Samiti: पावसाअभावी मानोरा तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याअभावी जंगली प्राणी पाण्यासाठी वणवण भटकत असून, त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढण्याची शक्यता..

दुष्काळात जंगली जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करा; मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे मागणी

Manora Panchayat Samiti

मानोरा (Manora Panchayat Samiti) : यावर्षी पावसाअभावी मानोरा तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याअभावी जंगली प्राणी पाण्यासाठी वणवण भटकत असून, त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने मानोरा तालुक्यातील वनविभागात हौद व बंधारे उभारावेत, अशी मागणी पंचायत समिती, मानोरा च्या माजी सदस्याछाया मनोहर राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मानोरा तालुक्यातील (Manora Panchayat Samiti) वनविभाग हा हरतीचा, असोला  सोमनाथ नगर,  फुलउमरी, रतनवाडी शेंदुरजना आढाव या परिसरात मोठ्या प्रमाणात वनविभाग आणि वन्यप्राणी जमीन आहे. हा संपूर्ण परिसर डोंगराळ भागात असल्याने पावसाळ्यात पडणारे पाणी वाहून जात असल्याने या परिसरात गावातील वनविभागाच्या हद्दीत बंधारे उभारल्यास पाण्याची साठवणूक होऊ शकते. त्यामुळे आज जी भिषण पाणी टंचाईचे संकट उभे आहे त्यावर मात करण्यासाठी या परिसरात वनविभागाने बंधारे बांधण्याचे काम सुरू करावे. त्यासाठी वन मंत्रालयाने तात्काळ निधी उपलब्ध करून देणे, बंधाराचे सुरू करून जंगली जनावरांच्या पाण्यासाठीची भटकंती थांबवावी.

तसेच डोंगराळ भागातील गावकऱ्यांना पाण्याअभावी पाणीटंचाईचा सामना होतो. प्राचीन उन्हाळ्यात पाण्याची समस्या गंभीर होताना दिसत आहे. गाव उंचावर आणि डोंगराळ भागात असल्याने पाण्याच्या मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. पाणी साठविण्याची व्यवस्था नसल्याने उन्हाळ्यात विहिरींचे पाणी खोलावते. त्यामुळे या गावातील नागरिकांना दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. याचा त्रास नागरिकांसह शेतकरी आणि पशु-पक्षी व जंगली जनावरांनाही सहन करावा लागतो. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडविल्यास उन्हाळ्यात त्याचा उपयोग होऊ शकेल. गावालगत वनविभागाच्या हद्दीत ज्या बंधारे उभारल्यास पावसाचे पाणी साठविता येईल. त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होईल.

विहिरींमधील पाणीसाठ्यात वाढ शकते. परिणामी, उन्हाळ्यातील पाणीटंचाई कमी होण्यास मदत मिळेल. त्यांचा अनेक वर्षांपासून तालुक्यातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वनविभाग आणि संबंधित प्रशासनाने गावलगतच्या जंगली भागात करून बंधारे उभारण्यासाठी तात्काळ पुढाकार घेऊन वनविभागाने बंधारे बांधण्याचे काम सुरू करावे ही विनंती. याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयासह वनमंत्री गणेश नाईक  पालकमंत्री दत्तात्रय भरणे,  मुख्य वनरक्षक वनमंत्री नागपूर,  मुख्य वन संरक्षक प्रादेशिक यवतमाळ, उपवन संरक्षक वाशिम,  वनपरिक्षेत्र अधिकारी मानोरा यांनाही दिले आहे.

संबंधित सामग्री

दुष्काळात पाण्याची उधळपट्टी! चिरकुटा धरणाची मुख्य पाईपलाईन फुटली; हजारो लिटर पाणी शेतात, २८ गावांचा पाणीपुरवठा धोक्यात

दुष्काळात पाण्याची उधळपट्टी! चिरकुटा धरणाची मुख्य पाईपलाईन फुटली; हजारो लिटर पाणी शेतात, २८ गावांचा पाणीपुरवठा धोक्यात

मानोरा तालुक्यात चिरकुटा धरणाची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी शेतात; २८ गावांचा पाणीपुरवठा धोक्यात येण्याची भीती, ग्रामस्थांची दुरुस्तीची मागणी.

Nov 11, 2026
गोकुळ दूध संघ निवडणुकीत लोकशाहीची गळचेपी?

गोकुळ दूध संघ निवडणुकीत लोकशाहीची गळचेपी?

गोकुळ दूध संघातील नियुक्त सदस्यांच्या मतदानाच्या अधिकाराविरोधात मानोरा काँग्रेस आक्रमक; शासन निर्णय रद्द करून अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची मागणी.

Nov 09, 2026
मानोऱ्यात मनोज जरांगे पाटलांचे जंगी स्वागत; समाजबांधव आणि शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती

मानोऱ्यात मनोज जरांगे पाटलांचे जंगी स्वागत; समाजबांधव आणि शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती

मनोज जरांगे पाटील यांचे मानोरा शहरात आगमन होताच समाजबांधव आणि शेतकऱ्यांनी जंगी स्वागत केले. यावेळी नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

Nov 09, 2026
मानोरा पोलिसांची कारवाई; १६ मोबाईल शोधून मूळ मालकांना परत! 

मानोरा पोलिसांची कारवाई; १६ मोबाईल शोधून मूळ मालकांना परत! 

Manora Police Action: मानोरा पोलीस स्टेशन हद्दीतील गहाळ झालेले १६ मोबाईल फोन पोर्टलच्या माध्यमातून शोधून काढण्यात मानोरा पोलिसांना यश आले.

Nov 06, 2026
राज्यातील पहिल्याच ऐतिहासिक गोदान सोहळ्याने रचला नवा अध्याय

राज्यातील पहिल्याच ऐतिहासिक गोदान सोहळ्याने रचला नवा अध्याय

Manora Cow-Worship Grand Ceremony: बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे दीपावलीच्या पहिल्याच दिवशी वसुबारसच्या शुभमुहूर्तावर भव्य व ऐतिहासिक गोदान आणि गोपूजन महासोहळा

Nov 05, 2026