निलंगा जुगार अड्डा धाड

निलंगा शहरात जुगार अड्ड्यावर पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची धाड

Nilanga gambling den raid: लातूर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांविरोधात कारवाई करण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पाठविलेल्या विशेष पथकाने निलंगा जुगार अड्ड्यावर धाड..

निलंगा शहरात जुगार अड्ड्यावर पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची धाड

Nilanga gambling den raid

 

१३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

निलंगा (Nilanga gambling den raid) : लातूर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांविरोधात कारवाई करण्यासाठी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पाठविलेल्या विशेष पथकाने निलंगा येथे जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या कारवाईत १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, रोख रकमेसह १३ मोबाईल आणि १० मोटारसायकली असा एकूण ११ लाख २ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नांदेड परिक्षेत्रांतर्गत लातूर जिल्ह्यात अवैध व्यवसाय सुरू असल्याबाबतच्या तक्रारी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांना प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत त्यांनी आपल्या अधिकारी व अंमलदारांचे विशेष पथक लातूर जिल्ह्यात कारवाईसाठी रवाना केले होते.

या पथकाने २५ ऑक्टोबर २०२६ रोजी निलंगा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बँक कॉलनी परिसरात विठ्ठल वाघमोडे यांच्या पत्र्याच्या शेडसमोर सुरू असलेल्या ‘तिर्रट’ जुगारावर कारवाई केली. यावेळी ४३ हजार ६५० रुपयांची रोख रक्कम, १३ मोबाईल आणि १० मोटारसायकली असा एकूण ११,०२,६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या (Nilanga gambling den raid) प्रकरणी एकूण १३ जणांविरुद्ध निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७८/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोलीस हवालदार प्रदीप खानसोळे, गणेश राठोड, संदीप वाघाडे आणि गजानन डवरे यांच्या पथकाने केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले.

अवैध व्यवसायांची माहिती ‘खबर’ हेल्पलाइनवर द्या

नागरिकांना आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचविता यावी, यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाच्या वतीने ९१५०१००१०० या मोबाईल क्रमांकावर ‘खबर’ हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या भागात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांची माहिती या हेल्पलाइनद्वारे पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.