NCMC ST Corporation: एसटी महामंडळाचा सॉफ्टवेअर समस्या यामुळे महिलांना तिकीट टॉप-अपसाठी तक्रार पडत आहे, ज्या यांना ‘लाडक्या बहिणीं’वर आर्थिक ताण दाखल होत आहे.
ऐनसणासुदीच्या काळात महिला व ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक फटका; वाहक आणि प्रवाशांमध्ये रोजचे वाद
रिसोड (NCMC ST Corporation) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळ) सवलतीच्या प्रवासा बाबत घेतलेला नवा निर्णय महिलांसह ज्येष्ठ नागरिक आणि वाहकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. 1 सप्टेंबर 2026 पासुन महिला,ज्येष्ठ नागरिक आणि अमृत महोत्सवी जेष्ठ नागरिकांना सवलतीचे तिकीट केवळ 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड'द्वारेच (NCMC) देण्याचा निर्णय लागु करण्यात आला आहे.मात्र योग्य तांत्रिक पुर्व तयारी शिवाय घेतलेल्या या निर्णयामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत आहे.
नॅशनल काॅमन मोबिलिटी कार्ड सॉफ्टवेअर ठप्प, टॉप-अप सुविधेअभावी वाहक हतबल होत आहेत. एसटी प्रशासनाने या NCMC कार्डमध्ये रक्कम भरण्याची (Top-up) सुविधा थेट बस मधील वाहकां मार्फत उपलब्ध करून दिली आहे.मात्र, महामंडळाच्या ई-तिकीट यंत्रातील सॉफ्टवेअर वारंवार हँग होत असल्याने आणि नेटवर्क समस्येमुळे कार्ड टॉप-अप होत नाही.प्रवाशांच्या कार्डमध्ये आवश्यक शिल्लक नसल्याने वाहक प्रवाशांना सवलतीचे तिकीट देण्यास नकार देत आहेत.परिणामी दररोज बस प्रवासात वाहक आणि प्रवाशांमध्ये तीव्र वादावादीचे प्रसंग घडत आहेत.
यामुळे ऐन सणासुदीत काळात 'लाडक्या बहिणीं'वर आर्थिक भार पडत आहे.सध्या सणासुदीचे दिवस सुरू असताना शासनाने महिलांसाठी सवलतीचा प्रवास उपलब्ध करून दिला असला, तरी कार्डच्या सक्तीमुळे अनेक महिलांना पुर्ण तिकीट काढुन प्रवास करावा लागत आहे. "एकिकडे 'लाडकी बहीण' म्हणायचे आणि दुसरीकडे सणासुदीतच अशा जाचक अटी लावुन बहिणींचा खिसा कापायचा," असा थेट सवाल संतप्त महिला प्रवासी विचारत आहेत.
खाजगी कंपनीच्या फायद्या साठी सक्तीचा आरोप
कार्ड वितरक खाजगी कंपनीने प्रवाशांसाठी ऑनलाईन किंवा बसस्थानकांवर टॉप-अपच्या पुरेशा स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत.त्यामुळे ही सक्ती नेमकी सामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी आहे की खाजगी कंपनीच्या व्यावसायिक फायद्या साठी, असा संशय प्रवाशां कडुन व्यक्त होत आहे.कोणतीही सुलभ पर्याय व्यवस्था न देता थेट सक्ती लादल्याने प्रवाशांमध्ये शासनाविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
नियम शिथिल करण्याची मागणी
जोपर्यंत NCMC कार्ड प्रणाली,टॉप-अप सुविधा आणि सॉफ्टवेअर सुरळीत काम करत नाही,तो पर्यंत पुर्वी प्रमाणेच ओळखपत्राच्या आधारे सवलतीची तिकिटे देणे सुरू ठेवावे,अशी जोरदार मागणी महिला,ज्येष्ठ नागरिक संघटना आणि प्रवासी वर्गातुन केली जात आहे.तांत्रिक गोंधळ तातडीने न सुधारल्यास आंदोलनाचा इशाराही प्रवाशांनी दिला आहे.
अनेक प्रवाशांचे NCMC कार्ड अॅक्टीवच नाही,रिचार्जची वाताहात
एसटी च्या सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्ड सक्तीचे (NCMC ST Corporation) केल्या नंतर बहुतांश प्रवाशांचे कार्ड अॅक्टीवच नाही तर वाहकाचे मोबाईल चे इंटरनेट कनेक्ट केल्या शिवाय मशिन अॅक्टीव होत नसल्याने वाहकांचा मणस्ताप वाढत आहे.(एसटी प्रशासनाने डिजिटल प्रणाली सुरू केली असली तरी ग्रामीण भागात योग्य पायाभूत सुविधा नसताना ही सक्ती प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ग्रामीण भागातील बहुतांश बसस्थानकांवर व आगारांमध्ये कार्ड टॉप-अप (Top-up) करण्यासाठी पुरेशी केंद्रे नाहीत.
तसेच ई-तिकीट मशीन्स वारंवार हँग होणे किंवा नेटवर्क नसणे यांसारख्या समस्यांमुळे प्रवाशांना विनाकारण भुर्दंड सहन करावा लागत आहे. अत्यंत संवेदनशील व महत्त्वाचा विषय असल्याने, मा. आ. प्रताप सरनाईक यांनी या विषयात स्वतः लक्ष घालून संबंधितांना तातडीने योग्य त्या सूचना द्याव्यात आणि सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळवून द्यावा, अशी आग्रही मागणी लखनसिंह ठाकूर यांनी केली आहे.