Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

National Teachers Award 2026

लातूरच्या वैभव कुलकर्णी यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातील ४८ शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६ साठी निवड करण्यात आली आहे.


लातूरच्या वैभव कुलकर्णी यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

National Teachers Award 2026 |

शिक्षक दिनी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार पुरस्कार वितरण

लातूर : शिक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातील ४८ शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६ साठी निवड करण्यात आली आहे. या मानाच्या पुरस्कारासाठी लातूर येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयातील शिक्षक वैभव वसंतराव कुलकर्णी यांची निवड झाली आहे. शिक्षक दिनानिमित्त ५ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या वतीने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान केला जातो. नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि व्यक्तिमत्त्व विकास, शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केलेले प्रयत्न तसेच सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातून वैभव वसंतराव कुलकर्णी (लातूर), डॉ. कविता नृसिंहराव गिट्टे (बीड), कुंदा जयवंत बच्छाव (नाशिक) आणि शिवप्रसाद अरविंद टिंगरे (सातारा) यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.

लातूर येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात कार्यरत असलेले वैभव कुलकर्णी यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा, विज्ञान-तंत्रज्ञान आणि कौशल्याधारित शिक्षणावर विशेष भर दिला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध शालेय तसेच राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

तीन टप्प्यांत निवड प्रक्रिया

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी यंदा जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय अशा तीन स्तरांवर निवड प्रक्रिया पार पडली. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय पोर्टलवर १५ जून ते २० जुलै २०२६ या कालावधीत पात्र शिक्षकांकडून ऑनलाइन स्व-नामांकन मागविण्यात आले होते.

विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, नावीन्यपूर्ण अध्यापन, व्यक्तिमत्त्व विकास, शाळेच्या गुणवत्तावाढीसाठी करण्यात आलेले प्रयत्न आणि वंचित घटकांसाठी केलेले कार्य या निकषांच्या आधारे मूल्यमापन करण्यात आले. या प्रक्रियेनंतर अंतिम ४८ शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

विज्ञान भवनात राष्ट्रीय गौरव

शिक्षक दिनानिमित्त ५ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे विशेष पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते निवड झालेल्या शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

या सोहळ्यात पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी केलेल्या प्रेरणादायी कार्याची माहिती देणारे लघुपटही प्रदर्शित करण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे दूरदर्शन, शिक्षण मंत्रालयाची ‘स्वयं प्रभा’ वाहिनी, अधिकृत वेबकास्ट तसेच सोशल मीडिया माध्यमांवरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

Related to this topic: