Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

औंधा नागनाथ गुटखा जप्त

औंढा नागनाथ पोलिसांची कामगिरी; अनखळी येथे १ लाख  ४२ हजाराचा गुटखा जप्त

Aundha Nagnath gutkha seized: औंढा नागनाथ  तालुक्यातील अनखळी येथे पोलिसांनी छापा मारून १ लाख ४२ हजाराचा गुटखा  जप्त केला. या प्रकरणात औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


औंढा नागनाथ पोलिसांची कामगिरी अनखळी येथे १ लाख  ४२ हजाराचा गुटखा जप्त

Aundha Nagnath gutkha seized |

हिंगोली (Aundha Nagnath gutkha seized) : औंढा नागनाथ  तालुक्यातील अनखळी येथे पोलिसांनी छापा मारून १ लाख ४२ हजाराचा गुटखा  जप्त केला. या प्रकरणात औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

अवैध व्यवसायाला पाबंद घालण्यासाठी नांदेड  परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या निर्देशावरून हिंगोली जिल्ह्यात पोलिस अधिक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांच्या सुचनेवरून छापे मारले जात आहेत. २० ऑगस्टरोजी औंढा नागनाथ पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये अनखळी गावात माणिक यशवंतराव गारकर यांच्या  घरामध्ये अवैध गुटख्याचा साठा साठवणुक केल्याची माहिती मिळाल्याने पोलिस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांनी पोलिस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे, पोलिस उपनिरीक्षक इंगळे यांच्यासह राजकुमार कुटे, शेळके यांच्या पथकाला छापा मारण्यास रवाना केले. यामध्ये पथकाने १ लाख ४२ हजार ७८० रुपयाचा गुटखा जप्त केला. औंढा ना. पोलिसात माणिक यशवंतराव गारकर, संजय बाळासाहेब गारकर या दोघावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.