नांदेड जिल्हा सत्र न्यायालय

नांदेडच्या जिल्हा सत्र न्यायालयात बॉम्बची अफवा; मेलवर माहिती आल्याने एकच खळबळ

NANDED DISTRICT SESSIONS COURT: नांदेडच्या जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात 2 नोव्हेंबर एकच खळबळ उडाली. त्याचे  मुख्य कारण होते मेलद्वारे आलेल्या संदेशानुसार बॉम्बने न्यायालय उडून देण्याची धमकी.

नांदेडच्या जिल्हा सत्र न्यायालयात बॉम्बची अफवा; मेलवर माहिती आल्याने एकच खळबळ

NANDED DISTRICT SESSIONS COURT

नांदेड (NANDED DISTRICT SESSIONS COURT) : नांदेडच्या जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात 2 नोव्हेंबर एकच खळबळ उडाली. त्याचे  मुख्य कारण होते मेलद्वारे आलेल्या संदेशानुसार बॉम्बने न्यायालय उडून देण्याची धमकी. सदर संदेश प्राप्त होताच  न्यायालयीन कामकाज बंद ठेवण्यात आले . या संदेशामुळे पोलीस प्रशासनासह शहरात एकच  खळबळ उडाली.

सोमवारी 2 नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयाचे (NANDED DISTRICT SESSIONS COURT) कामकाज सुरू होते, दरम्यान एका संघटनेचे माध्यमातून जिल्हा न्यायालयाच्या मेलवर न्यायालय बॉम्बद्वारे न्यायालय उडवून देण्याची धमकी देणारा संदेश प्राप्त झाला. सदर संदेश प्राप्त होताच सदर घटनेची माहिती जिल्हा पोलीस प्रशासनाला देण्यात आली. याची दखल घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी न्यायालय परिसरात दाखल झाले. संदेश प्राप्त होताच न्यायालयातील संपूर्ण कामकाज बंद पाडून वकील वर्गासह संपूर्ण कर्मचारी वर्ग न्यायालयाच्या बाहेर पडले. यावेळी बॉम्ब शोध पथक श्वानपथक पाचारण करण्यात आले होते.

2 नोव्हेंबर रोजी दिवसभरात या घटनेने नांदेड शहरात एकाच खळबळ उडाली होती. (NANDED DISTRICT SESSIONS COURT) न्यायालयासमोरील रस्त्यावर पोलिसांची वाहने व गर्दी आढळून आली. सायंकाळी उशिरापर्यंत याबाबत चौकशीसाठी  संबंधित यंत्रणा कार्यान्वित असल्याचे दिसून आले. एकंदरीत न्यायालयाला प्राप्त झालेल्या संदेशामुळे शहरात चांगलीच खळबळ झाली होती. मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार नांदेड सह हिंगोली परभणी लातूर व राज्यातील इतर जिल्हा न्यायालयालाही असा संदेश प्राप्त झाल्याची माहिती मिळाली आहे. सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत न्यायालयातील प्रत्येक कक्षाची कसून चौकशी करण्यात येत होती.