राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त नागपूर जिल्हा युनिफाइड हॉकी असोसिएशनतर्फे कार्यक्रम
नागपूर (Major Dhyan Chand Jayanti) : हॉकीचे जादूगार आणि महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त नागपूर जिल्हा युनिफाइड हॉकी असोसिएशनच्या वतीने मेजर ध्यानचंद (Major Dhyan Chand Jayanti) यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा माजी आमदार संदीप जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी नागपूर परिसरात हॉकीच्या प्रचार-प्रसारासाठी तसेच युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या माध्यमातून युवकांमध्ये क्रीडा संस्कृती, शारीरिक तंदुरुस्ती आणि खिलाडूवृत्ती रुजविण्याचा संदेश देण्यात आला. (Major Dhyan Chand Jayanti) मेजर ध्यानचंद यांनी भारतीय हॉकीला दिलेले योगदान, त्यांचे समर्पण आणि क्रीडा क्षेत्रातील कामगिरी आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
कार्यक्रमास नागपूर जिल्हा युनिफाइड हॉकी असोसिएशनचे सचिव परवेझ कुरेशी, उपाध्यक्ष शोएब परवेझ, खजिनदार अनिल दराल, संयुक्त सचिव अॅड. वंदना तसेच कार्यकारिणी सदस्य फैयाज कुरेशी, राजेश बिहारी, देवेश स्वामी, कुणाल पाटील आणि जावेद राणा उपस्थित होते.