Nagpur Graduate Constituency Election

कराळे मास्तर ठरणार किंगमेकर!

नागपूर पदवीधर निवडणुकीत कराळे गुरुजींना २४,२४९ मते. कोहळे-वांजारी यांच्यातील चुरशीच्या लढतीत दुसऱ्या पसंतीची मते निर्णायक ठरणार का?

कराळे मास्तर ठरणार किंगमेकर!

२४ हजार २४९ मते मिळवत वेधले लक्ष; कोहळे-वांजारींच्या लढतीत दुसऱ्या पसंतीच्या मतांची चर्चा

वर्धा : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत नितेश बालकृष्णाजी कराळे गुरुजी यांनी २४ हजार २४९ मते मिळवत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. भाजपचे सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांना ६० हजार ९२४, तर काँग्रेसचे अभिजित गोविंदराव वंजारी यांना ५६ हजार ६३० मते मिळाली आहेत. दोन्ही प्रमुख उमेदवारांमध्ये केवळ ४ हजार २९४ मतांचे अंतर असल्याने कराळे गुरुजींच्या मतांची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे कराळे मास्तर किंगमेकर ठरणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या निवडणुकीत पहिल्या फेरीत काँग्रेसचे अभिजित वंजारी आघाडीवर होते. मात्र, दुसऱ्या फेरीत भाजपचे सुधाकर कोहळे यांनी आघाडी घेतली. त्यामुळे दोन्ही उमेदवारांमधील चुरस वाढली आहे.

निवडणुकीच्या आदल्या दिवशी कराळे गुरुजी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निष्कासित करण्याचा आदेश आल्याची चर्चा होती. मात्र, त्यानंतरही त्यांनी २४ हजारांहून अधिक मते मिळवत आपली स्वतंत्र राजकीय ताकद दाखवून दिली.

दुसऱ्या पसंतीच्या मतांकडे लक्ष

कोहळे आणि वंजारी यांच्यातील मतांचे अंतर कमी असताना कराळे यांना मिळालेल्या मतांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे दुसऱ्या पसंतीची मते कोणाच्या बाजूने जातात, याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, कराळे यांना प्रथम पसंती दिलेल्या मतदारांची दुसऱ्या पसंतीची मते अभिजित वंजारी यांच्या बाजूने जाऊ शकतात. मात्र, प्रत्यक्ष मतांचे हस्तांतरण आणि अधिकृत मतमोजणीच्या प्रक्रियेनंतरच याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.

२४ हजार २४९ मतांच्या जोरावर कराळे गुरुजींनी या निवडणुकीत आपली स्वतंत्र छाप पाडली आहे. आता दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या गणितात त्यांची भूमिका किती महत्त्वाची ठरते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

'हातात राज्यघटना, कृती मात्र विरोधात'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा

'हातात राज्यघटना, कृती मात्र विरोधात'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा

Save Democracy, Remove Anarchy: राज्यघटनेच्या रक्षणाचा दावा करणाऱ्या काँग्रेसची कृती मात्र घटनात्मक तत्त्वांच्या विरोधात असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. काँग्रेस नेते राहुल गांधी

Nov 05, 2026
'उद्धव ठाकरेंनंतर आता एकनाथ शिंदेंची शिवसेना फुटणार?' -अतुल लोंढे

'उद्धव ठाकरेंनंतर आता एकनाथ शिंदेंची शिवसेना फुटणार?' -अतुल लोंढे

शिंदेंची शिवसेना फुटणार? महायुतीतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते अतुल लोंढेंच्या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.

Oct 30, 2026
पदवीधर, शिक्षक मतदारसंघांची आचारसंहिता संपुष्टात; मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे आदेश जारी

पदवीधर, शिक्षक मतदारसंघांची आचारसंहिता संपुष्टात; मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे आदेश जारी

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांची आचारसंहिता संपली. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने 29 ऑक्टोबर रोजी आदेश जारी केला.

Oct 30, 2026
नागपुरातील भाजपच्या पराभवाने महायुतीत खळबळ; फडणवीसांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह?

नागपुरातील भाजपच्या पराभवाने महायुतीत खळबळ; फडणवीसांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह?

Maharashtra Legislative Council Election: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नागपुरात काँग्रेसने विजय मिळवल्याने महायुतीमधील राजकीय..

Oct 29, 2026
“भाजपसोबत कधीच जाणार नाही”; नितेश कराळेंचा ठाम पवित्रा, म्हणाले, “मी किंगमेकर बनलो!”

“भाजपसोबत कधीच जाणार नाही”; नितेश कराळेंचा ठाम पवित्रा, म्हणाले, “मी किंगमेकर बनलो!”

नागपूर पदवीधर निवडणुकीतील यशानंतर नितेश कराळेंची प्रतिक्रिया; भाजपमध्ये जाण्यास स्पष्ट नकार, शरद पवारांबद्दल आदर आणि पुढील निवडणुकांवर लक्ष.

Oct 29, 2026