Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

बोखारा ग्रामपंचायत अर्भक

बोखारा ग्रामपंचायत हद्दीत नालीवर अविकसित अर्भक मृतावस्थेत आढळले; घटनेने खळबळ

Bokhara Gram Panchayat Infant: नागपूर जिल्ह्यातील हिंगणा विधानसभा मतदारसंघातील बोखारा ग्रामपंचायत हद्दीत नालीवर अंदाजे चार ते पाच महिन्यांचे अविकसित अर्भक मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ


बोखारा ग्रामपंचायत हद्दीत नालीवर अविकसित अर्भक मृतावस्थेत आढळले घटनेने खळबळ

Bokhara Gram Panchayat Infant |

खापरखेडा (Bokhara Gram Panchayat Infant) : नागपूर जिल्ह्यातील हिंगणा विधानसभा मतदारसंघातील बोखारा ग्रामपंचायत हद्दीत नालीवर अंदाजे चार ते पाच महिन्यांचे अविकसित अर्भक मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, अर्भक नालीवर कोणी आणि कोणत्या परिस्थितीत फेकले, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोखारा ग्रामपंचायत परिसरातील एका नालीवर अविकसित अवस्थेतील अर्भक पडले असल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संतोष साहू आणि गजानन वानखेडे यांनी तत्काळ ११२ क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली.

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृत अर्भक ताब्यात घेतले. त्यानंतर आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया करण्यात येत असून, अर्भकाच्या मृत्यूचे नेमके कारण तसेच ते नालीवर कसे आले, याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे.

दरम्यान, या (Bokhara Gram Panchayat Infant) घटनेबाबत सूत्रांकडून विविध माहिती समोर येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलीचे एका युवकासोबत प्रेमसंबंध असल्याची चर्चा आहे. या संबंधातून ती गर्भवती राहिल्याचे आणि बदनामीच्या भीतीने गर्भपात करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या सर्व बाबींची अधिकृत पुष्टी पोलिसांकडून अद्याप करण्यात आलेली नाही.

सदर प्रकरणात अल्पवयीन मुलीचा सहभाग असल्याची माहिती असल्याने तिची ओळख गोपनीय ठेवण्यात येत आहे. तसेच या प्रकरणामागे नेमके कोण आहेत, गर्भपाताचा प्रयत्न झाला होता का, अर्भकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आणि ते नालीवर कोणी फेकले, याचा तपास पोलीस करीत आहेत. घटनेमुळे बोखारा परिसरात चर्चेला उधाण आले असून, पोलिसांच्या तपासातून या प्रकरणाचे नेमके सत्य समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related to this topic: