Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

भटसावंगी महिला मृत्यू

भटसावंगी येथे मारहाणीत महिलेचा मृत्यू; तीन आरोपीवर गुन्हा दाखल

Bhatsavangi woman Death:


भटसावंगी येथे मारहाणीत महिलेचा मृत्यू तीन आरोपीवर गुन्हा दाखल

Bhatsavangi woman Death |

हिंगोली (Bhatsavangi woman Death) : तालुक्यातील भटसावंगी येथे दारूच्या नशेत झालेल्या कौटुंबिक वादातून ६० वर्षीय महिलेचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी बासंबा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास भटसावंगी येथे हा प्रकार घडला. सचिन भागोराव कपाटे रा. भटसावंगी हे घरी असताना पांडुरंग तुकाराम कपाटे याने दारू पिऊन सचिनला शिवीगाळ करीत चापटाबुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी सचिनची  आई मंगल भागोराव कपाटे (६०) यांनी भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी केली. त्यांनी आरोपीस समजावून सांगितले की मारू नको, त्याला जिवंत सोड, असे म्हणत असताना आरोपीने शिवीगाळ करून त्यांचे हात पकडले. त्याचवेळी आरोपी यशोदाबाई तुकाराम कपाटे हिने  मंगल कपाटे यांच्या कमरेला धरून ठेवले आणि आरोपी  कविता तुकाराम कपाटे हिने अंगणातील पडलेला लाकडी दांडा उचलून मंगल कपाटे यांच्या डोक्यात मारला.

या (Bhatsavangi woman Death) मारहाणीत त्या गंभीर जखमी होऊन मंगल कपाटे यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सचिन कपाटे यांनी बासंबा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पांडुरंग तुकाराम कपाटे, यशोदाबाई तुकाराम कपाटे, कविता तुकाराम कपाटे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोउपनि धोत्रे हे करीत आहेत.दरम्यान गुन्ह्यातील पांडुरंग कपाटे याने विषारी औषध प्राशन केल्याने त्याच्यावर हिंगोलीतील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. गुन्ह्यातील दोन्ही आरोपी महिलांना बासंबा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Related to this topic: