Mumbai Terror Threat

मुंबईत १५ ऑगस्टपूर्वी दहशतवादी हल्ल्याची धमकी; महापौर रितू तावडे यांच्या ई-मेलवर खळबळजनक संदेश

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मुंबईत १५ ऑगस्टपूर्वी दहशतवादी हल्ल्याची धमकी; महापौर रितू तावडे यांच्या ई-मेलवर खळबळजनक संदेश

Mumbai Terror Threat

महापौर कार्यालय, मुंबई मेट्रो, शाळा आणि स्टॉक मार्केटला लक्ष्य करण्याची धमकी; मेलमध्ये खालिस्तान समर्थकांच्या नावांचा उल्लेख, पोलिसांकडून तपास सुरू

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अधिकृत ई-मेलवर १५ ऑगस्टपूर्वी शहरातील विविध ठिकाणी हल्ले करण्याची धमकी देणारा मेल आल्याची माहिती समोर आली आहे. या संदेशामुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या ई-मेलमध्ये महापौर कार्यालय, मुंबई मेट्रो, शाळा तसेच शेअर बाजाराची इमारत (स्टॉक मार्केट) येथे स्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मेलमध्ये काही खालिस्तान समर्थकांची नावे नमूद करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.

हा धमकीचा ई-मेल नेमका कोणी पाठवला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. संबंधित प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून सुरू असून, मुंबई पोलिसांकडून या प्रकरणावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

१५ ऑगस्टपूर्वी हल्ल्याची धमकी

स्वातंत्र्यदिनाच्या काही दिवस आधीच हा ई-मेल प्राप्त झाल्याने सुरक्षा यंत्रणांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. संदेशात १५ ऑगस्टपूर्वी मुंबईत हल्ले घडवून आणण्याचा उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे.

या पार्श्वभूमीवर शाळेत जाणारी मुले आणि मेट्रोने प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, महापौर रितू तावडे यांना धमकीचा ई-मेल मिळण्याची ही पहिली घटना नसल्याचेही समोर आले आहे.

यापूर्वीही मिळाला होता धमकीचा ई-मेल

यापूर्वी १० जून रोजी पाठवण्यात आलेल्या एका ई-मेलमध्ये मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE), मुख्यमंत्री कार्यालय, मुंबई महापालिका (BMC) इमारत, महापौर रितू तावडे यांचे कार्यालय यांसह इतर ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती.

त्या घटनेनंतर मुंबईतील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. मात्र, तपास पूर्ण झाल्यानंतर संबंधित धमकीचा ई-मेल बोगस असल्याचे स्पष्ट झाले होते.

आता पुन्हा एकदा १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर धमकीचा मेल आल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, या संदेशामागे नेमके कोण आहे आणि त्यामागील उद्देश काय आहे, याचा तपास सुरू आहे.

संबंधित सामग्री

भारतात राहणीमानाचा दर्जा सर्वात निकृष्ट! दिल्ली-मुंबई देशात अव्वल, पण जगात पार शेवटी..

भारतात राहणीमानाचा दर्जा सर्वात निकृष्ट! दिल्ली-मुंबई देशात अव्वल, पण जगात पार शेवटी..

Global Cities Index 2026: भारतातील प्रमुख महानगरे आर्थिक विकास आणि मानवी कौशल्याच्या बाबतीत आघाडीवर असली, तरी नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा आणि पर्यावरणाच्या गुणवत्तेबाबत अद्याप खूप मागे...

Oct 15, 2026
मुंबईकरांनो, हॉटेलमध्ये जेवण महागणार! खाद्यपदार्थांच्या दरात १० ते १५ टक्के वाढ होण्याची शक्यता

मुंबईकरांनो, हॉटेलमध्ये जेवण महागणार! खाद्यपदार्थांच्या दरात १० ते १५ टक्के वाढ होण्याची शक्यता

मुंबईतील हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ महागण्याची शक्यता. वाढत्या व्यावसायिक खर्चामुळे १० ते १५ टक्के दरवाढीचा विचार सुरू आहे.

Oct 15, 2026
एल निनोचा संभाव्य प्रभाव आणि पावसाच्या बदलत्या प्रमाणाची चिंता; मुंबई महापालिका जुन्या विहिरींकडे वळली

एल निनोचा संभाव्य प्रभाव आणि पावसाच्या बदलत्या प्रमाणाची चिंता; मुंबई महापालिका जुन्या विहिरींकडे वळली

एल निनो आणि पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन मुंबई महापालिकेचा विहिरींच्या पुनरुज्जीवनावर भर. प्रभाकर शिंदे यांचे कामांना वेग देण्याचे निर्देश.

Oct 15, 2026
दुष्काळ आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर दिवाळीत एसटी भाडेवाढ नाही! प्रताप सरनाईकांनी १५ टक्के वाढीचा प्रस्ताव फेटाळला

दुष्काळ आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर दिवाळीत एसटी भाडेवाढ नाही! प्रताप सरनाईकांनी १५ टक्के वाढीचा प्रस्ताव फेटाळला

दिवाळी २०२६ मध्ये एसटी भाडेवाढीला ब्रेक! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रस्तावित १५ टक्के हंगामी वाढ नामंजूर केली.

Oct 15, 2026
इम्रान खानला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस; मुंबई पोलिसांची इमिग्रेशन कायद्यानुसार कारवाई

इम्रान खानला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस; मुंबई पोलिसांची इमिग्रेशन कायद्यानुसार कारवाई

अभिनेता इम्रान खानला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस बजावल्याचे वृत्त. ऑगस्ट क्रांती मैदानावरील आंदोलन प्रकरणात मुंबई पोलिसांची कारवाई.

Oct 15, 2026