Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मुंबई

Mumbai Rickshaw Fare Hike

मुंबईत रिक्षा-टॅक्सी प्रवास महागणार; १ सप्टेंबरपासून नवे भाडेदर लागू

मुंबई महानगर प्रदेशातील रिक्षा आणि टॅक्सी प्रवाशांच्या खिशावर आता अतिरिक्त भार पडणार आहे.


मुंबईत रिक्षा-टॅक्सी प्रवास महागणार १ सप्टेंबरपासून नवे भाडेदर लागू

Mumbai Rickshaw Fare Hike |

रिक्षाच्या किमान भाड्यात १ रुपया, तर काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या किमान भाड्यात २ रुपयांची वाढ; MMR क्षेत्रातील अनेक भागांमध्ये नवे दर लागू

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील रिक्षा आणि टॅक्सी प्रवाशांच्या खिशावर आता अतिरिक्त भार पडणार आहे. मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने (MMRTA) परिवहन आयुक्तांनी प्रस्तावित केलेल्या भाडेवाढीला मंजुरी दिली असून, येत्या १ सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीचे नवे भाडेदर लागू होणार आहेत.

या निर्णयानुसार रिक्षाच्या किमान भाड्यात १ रुपयांची, तर काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या किमान भाड्यात २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सध्या रिक्षाने पहिल्या दीड किलोमीटरसाठी प्रवाशांना किमान २६ रुपये मोजावे लागतात. नव्या दरांनुसार हे भाडे २७ रुपये होणार आहे.

काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या किमान भाड्यातही वाढ करण्यात आली आहे. सध्या ३१ रुपये असलेले किमान भाडे १ सप्टेंबरपासून ३३ रुपये करण्यात येणार आहे.

ही दरवाढ केवळ मुंबई शहरापुरती मर्यादित राहणार नाही. ठाणे, नवी मुंबई, कल्याण, वसई, विरार आणि पालघर या मुंबई महानगर प्रदेशातील भागांमध्येही नवे भाडेदर लागू होतील. त्यामुळे या परिसरात नियमितपणे रिक्षा आणि टॅक्सीने प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या मासिक प्रवास खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.

रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटना गेल्या काही काळापासून भाडेवाढीची मागणी करत होत्या. इंधनाचे वाढते दर, वाहनांच्या देखभाल-दुरुस्तीवरील खर्च, विम्याचे हप्ते, परवाना शुल्क आणि इतर परिचालन खर्च वाढल्याचा मुद्दा संघटनांनी उपस्थित केला होता. वाढत्या खर्चाच्या तुलनेत मिळणारे उत्पन्न अपुरे पडत असल्याने भाडेवाढ आवश्यक असल्याचे चालक संघटनांचे म्हणणे आहे.

यापूर्वी फेब्रुवारी २०२५ मध्ये रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा नव्या भाडेवाढीला मंजुरी मिळाल्याने मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांच्या दैनंदिन खर्चावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Related to this topic: