Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > पुणे

Mumbai-Pune Expressway

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; बसची चार वाहनांना धडक, १० जण जखमी

​​​​​​​मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भाताण बोगद्याजवळ पाच वाहनांचा भीषण अपघात झाला.


मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात बसची चार वाहनांना धडक १० जण जखमी

भाताण बोगद्यात अपघात; दोघांची प्रकृती चिंताजनक, पुण्याच्या मार्गिकेवर वाहतूक कोंडी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भाताण बोगद्याजवळ पाच वाहनांचा भीषण अपघात झाला. भरधाव बसने पुढे असलेल्या चार वाहनांना जोरदार धडक दिल्याने एक टेम्पो आणि तीन कारचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत ८ ते १० जण जखमी झाले असून त्यापैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर हा अपघात घडला. बसच्या धडकेमुळे चार वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर पुण्याच्या मार्गिकेवर वाहनांची मोठी गर्दी झाली. काही काळ एक्स्प्रेस वेवरील वाहतूक विस्कळीत होऊन कोंडी निर्माण झाली होती.

अपघातात ८ ते १० जण जखमी झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

Related to this topic: