चिखलीत घरफोडी प्रकरण

चिखलीत घरफोडी करणारा 'मोक्का'तील कुख्यात आरोपी गजाआड; चिखली पोलिसांची धडक कारवाई

Chikhali Burglary Case: श्रीकृष्णनगर भागात राहणाऱ्या एका वयोवृद्धाचे घर फोडून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लांबवणाऱ्या एका कुख्यात अट्टल चोराला चिखली पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली

चिखलीत घरफोडी करणारा 'मोक्का'तील कुख्यात आरोपी गजाआड; चिखली पोलिसांची धडक कारवाई

Chikhali Burglary Case

 

स्थानिक गुन्हे शोध पथकाने (D.B. Team) नेवासा येथून ठोकल्या मुसक्या; चोरीचा ऐवज हस्तगत

चिखली (Chikhali Burglary Case) : येथील श्रीकृष्णनगर भागात राहणाऱ्या एका वयोवृद्धाचे घर फोडून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लांबवणाऱ्या एका कुख्यात अट्टल चोराला चिखली पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. डीचेन त्र्यंबक भोसले (वय ४८, रा. सलाबतपूर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर यापूर्वी अनेक जिल्ह्यांत घरफोडी व दरोड्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर अहिल्यानगर जिल्ह्यात ‘मोक्का’ (MCOCA) अंतर्गत कारवाई झालेली आहे.

​घराचे कुलूप तोडून ७२ हजारांचा मुद्देमाल लांबवला

श्रीकृष्णनगर येथील रहिवासी रघुनाथ जगन्नाथ कंगले (वय ६९) हे २९ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मुलाकडे गेले होते. २ ऑगस्ट रोजी घरी परत आले असता त्यांना घराच्या गेटचे व दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले. घरात पाहणी केली असता कपाटातील सोन्याचे मंगळसूत्र, मणी, २५ चांदीची नाणी, चांदीचा शिक्का आणि रोख १२,००० रुपये असा एकूण ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

​अहिल्यानगर जिल्ह्यातून आवळल्या मुसक्या

ठाणेदार पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गुप्तबातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथून संशयित डीचेन भोसले याला ताब्यात घेतले. खाकीचा दणका मिळताच आणि पीसीआर दरम्यान कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.

​वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही (Chikhali Burglary Case) धडक कारवाई बुलढाणा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. भूषण गावंडे यांच्या नेतृत्वात पो.उप.नि. प्रवीण मोरे, म.पो.उप.नि. अश्विनी गाडे, तपास अंमलदार पो.हे.का. कैलास चतरकर, पो.का. सुधाकर पाडळे तसेच डी.बी. पथकाचे अमोल गवई, ललिता खरात, निलेश सावळे, अजय इटावा, प्रशांत धंदर, ज्ञानेश्वर शिंदे, परमेश्वर इंगळे आणि रूपाली उगले यांनी केली आहे.

संबंधित सामग्री

इम्रान खानला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस; मुंबई पोलिसांची इमिग्रेशन कायद्यानुसार कारवाई

इम्रान खानला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस; मुंबई पोलिसांची इमिग्रेशन कायद्यानुसार कारवाई

अभिनेता इम्रान खानला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस बजावल्याचे वृत्त. ऑगस्ट क्रांती मैदानावरील आंदोलन प्रकरणात मुंबई पोलिसांची कारवाई.

Oct 15, 2026
शिवाजी पार्क आंदोलन प्रकरणी आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आणि अंजली दमानिया यांच्यावर गुन्हे दाखल

शिवाजी पार्क आंदोलन प्रकरणी आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आणि अंजली दमानिया यांच्यावर गुन्हे दाखल

शिवाजी पार्क आंदोलन प्रकरणी आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आणि अंजली दमानियांविरोधात गुन्हे दाखल. मुंबई पोलिसांच्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात चर्चा.

Oct 12, 2026
महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी मुंबईत पोलिसांच्या ताब्यात; CJP आंदोलनाला पाठिंबा देण्यापूर्वी कारवाई

महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी मुंबईत पोलिसांच्या ताब्यात; CJP आंदोलनाला पाठिंबा देण्यापूर्वी कारवाई

CJP आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत निदर्शनांपूर्वी तुषार गांधी आणि फिरोज मिथिबोरवाला ताब्यात. ऑगस्ट क्रांती मैदानावरील कार्यक्रमाला परवानगी नसल्याचे पोलिसांचे म्हणणे.

Oct 10, 2026
अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा आरोप; ३ आरोपी अटकेत

अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा आरोप; ३ आरोपी अटकेत

अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून ३ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप; उर्वरित २५ हजार रुपये घेताना तिघांना अंधेरी पोलिसांनी अटक केली.

Oct 04, 2026
CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJPच्या शिवाजी पार्क आंदोलनात ७५ वर्षीय गोपालकृष्ण पिल्लईंचा हार्ट अटॅकने मृत्यू. अभिजीत दिपकेंविरोधात हत्येच्या गुन्ह्याची मागणी; आयोजकांवरही FIR.

Oct 04, 2026