जलद आणि धीम्या मार्गावरील अप-डाउन सेवा बंद; प्रवासी लोकलमध्ये अडकले, काहींनी रुळांवरून पायी जाण्याचा पर्याय निवडला
मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सेवा सोमवारी सकाळपासून सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे विस्कळीत झाली. सकाळी १० वाजता मुलुंड–ठाणे आणि कांजूरमार्ग–भांडूप या दोन विभागांत तांत्रिक अडचण निर्माण झाली. साडेतीन तासांनंतरही बिघाड दुरुस्त न झाल्याने जलद आणि धीम्या मार्गांवरील अप-डाउन वाहतूक ठप्प होती.
Mumbai local train issue https://t.co/9frRelAnzA
— siddhesh kadam (@sidhu1193) October 26, 2026
कार्यालयासाठी घराबाहेर पडलेले अनेक प्रवासी लोकलमध्येच अडकले. ऑक्टोबरच्या उष्णतेत गाड्या एकाच ठिकाणी थांबल्याने प्रवाशांचे हाल झाले. काहींनी प्रतीक्षा करण्याऐवजी लोकलमधून उतरून रेल्वे रुळांवरून पायी जाण्याचा निर्णय घेतला.
Please Avoid Travelling Towards Mumbai CSMT there is an signal & OHE failure I am stucked nearby bhandup since last 45 minutes @Central_Railway @drmmumbaicr @drmbct https://t.co/c4r0tNa4m0
— sahil kosireddy (@KosireddySahil) October 26, 2026
रेल्वे प्रशासनाला सकाळी १० वाजल्यापासून सेवा विस्कळीत करणारा सिग्नल बिघाड दुरुस्त करता आला नव्हता. तो दूर करण्यासाठी आणखी चार ते पाच तास लागू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे संध्याकाळी घरी परतणाऱ्या प्रवाशांनाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मध्य रेल्वेची सेवा बंद राहिल्यास ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि एलबीएस रोडवरील वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता आहे.
Thane station. 10 AM. 30 minutes, no train. Hundreds walking the tracks, because waiting is a luxury Mumbai's commuters can't afford. Nobody breaks the rules by choice. The system breaks them first. @RailMinIndia @drmmumbaicr @Central_Railway #MumbaiLocal #CentralLine https://t.co/vAHVlSXr1e
— Devvrat Mainhallikar (@devvratsm) October 26, 2026
एक दिवस आधीच मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला होता. त्यानंतर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. लोकल उशिराने धावणे आणि तांत्रिक बिघाड या वारंवार घडणाऱ्या समस्यांवरून रेल्वे प्रशासनावर टीका होत आहे. बिघाड दुरुस्त करण्यास विलंब का झाला, याबाबत प्रशासन काय स्पष्टीकरण देते, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.