Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मुंबई

Mumbai Contractor Death

थकीत बिलांचा ताण? मुंबईतील कंत्राटदार गजानन देवकाते यांचा आत्महत्येचा निर्णय

काम पूर्ण करूनही थकीत बिलांची रक्कम वेळेत न मिळाल्याने आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या कंत्राटदार गजानन देवकाते यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.


थकीत बिलांचा ताण मुंबईतील कंत्राटदार गजानन देवकाते यांचा आत्महत्येचा निर्णय

Mumbai Contractor Death |

काम पूर्ण करूनही बिलाची रक्कम मिळत नसल्याने देवकाते त्रस्त; वर्षभरापूर्वी कार्यकारी अभियंत्यांना पत्र लिहून मांडली होती व्यथा

मुंबई : काम पूर्ण करूनही थकीत बिलांची रक्कम वेळेत न मिळाल्याने आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या कंत्राटदार गजानन देवकाते यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर मुंबईतील व्यावसायिक वर्तुळात खळबळ उडाली असून, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवकाते यांनी संबंधित काम पूर्ण केले होते. मात्र, कामाचे बिल प्रलंबित राहिल्याने त्यांना वारंवार संबंधित कार्यालयात जावे लागत होते. थकीत रक्कम मिळवण्यासाठी अनेकदा पाठपुरावा करूनही बिलाची रक्कम मिळाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. वाढता आर्थिक ताण आणि खर्च यामुळे ते त्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, बिलाच्या विलंबाबाबत देवकाते यांनी वर्षभरापूर्वी कार्यकारी अभियंत्यांना पत्र लिहिल्याची माहितीही समोर आली आहे. काम पूर्ण करूनही वेळेत बिलाची रक्कम मिळत नसल्याने निर्माण झालेल्या अडचणी त्यांनी या पत्रातून मांडल्या होत्या. तसेच, बिल मिळवण्यासाठी संबंधित कार्यालयाच्या १० वेळा चकरा माराव्या लागत असल्याचा उल्लेख त्यांनी पत्रात केला होता.

या पार्श्वभूमीवर देवकाते यांच्या मृत्यूमागे प्रलंबित बिलांचा ताण कितपत कारणीभूत आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनेमागील नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी संबंधित बाबींची चौकशी सुरू आहे.

दरम्यान, कंत्राटदारांच्या प्रलंबित बिलांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने शासन आणि प्रशासनाला जाब विचारण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेत प्रलंबित बिलांमुळे कंत्राटदारांना भेडसावणाऱ्या समस्यांवर भूमिका मांडली जाणार आहे.

Related to this topic: