Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मुंबई

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

₹1500 हप्ता कुणाला मिळणार, कुणाला नाही? लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.


₹1500 हप्ता कुणाला मिळणार कुणाला नाही लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana |

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर 1 कोटी 41 लाख 85 हजार महिलांच्या खात्यात ₹2,095 कोटी जमा; आणखी 23 लाख लाभार्थींना हप्ता मिळण्याची शक्यता

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली. मात्र, पात्रतेच्या विविध निकषांमुळे राज्यातील सुमारे 53 हजार 637 महिलांना जुलैचा ₹1500 हप्ता मिळणार नसल्याचे समोर आले आहे.

मंगळवारी सायंकाळपर्यंत राज्यातील 1 कोटी 41 लाख 85 हजार महिलांच्या खात्यांमध्ये एकूण ₹2 हजार 95 कोटींचा निधी वर्ग करण्यात आला. उर्वरित लाभार्थी महिलांच्या खात्यांमध्ये पैसे जमा करण्याची प्रक्रिया त्यानंतरही सुरू होती. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी आणखी सुमारे 23 लाख महिलांच्या खात्यात हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, योजनेच्या लाभार्थी यादीची छाननी आणि ई-केवायसी प्रक्रिया यापूर्वीच करण्यात आली आहे. आधार क्रमांक, ई-केवायसी, उत्पन्नाची मर्यादा, कुटुंबातील शासकीय कर्मचारी, अन्य सरकारी योजनांचा लाभ तसेच योजनेच्या इतर पात्रता अटी तपासण्यात आल्या. या पडताळणीदरम्यान मोठ्या संख्येने महिला अपात्र ठरल्या आहेत.

राज्य सरकारने जून 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. सुरुवातीच्या टप्प्यात या योजनेत मोठ्या संख्येने महिलांनी अर्ज केले होते. एप्रिलअखेरपर्यंत अर्ज केलेल्या 2 कोटी 48 लाख महिलांपैकी सुमारे 92 लाख नोंदी अपात्र ठरवण्यात आल्या आहेत. परिणामी, योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थी महिलांची संख्या आता सुमारे 1 कोटी 65 लाखांवर आली आहे.

योजनेच्या पात्रतेनुसार 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना लाभ दिला जातो. 65 वर्षांची वयोमर्यादा पार केलेल्या महिलांना योजनेचा लाभ पुढे सुरू ठेवता येत नाही. त्यामुळे यावेळीही वयाच्या निकषामुळे अनेक महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत.

याच प्रक्रियेमुळे सुमारे 53 हजार 637 महिला जुलै महिन्याच्या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे ज्या महिलांच्या खात्यात अद्याप ₹1500 जमा झालेले नाहीत, त्यांच्यासाठी पात्रता आणि पडताळणीचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे.

Related to this topic: