मोटार सायकल विक्री फसवणुक

मोटार सायकल विक्रीत बनावट दस्ताऐवज; फसवणुकीचा गुन्हा 

Motorcycle sales fraud: औंढा नागनाथ येथील एका व्यक्तीला खोट्या दस्ताऐवजाव्दारे मोटार सायकल विक्री केल्याने एका आरोपीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती...

मोटार सायकल विक्रीत बनावट दस्ताऐवज; फसवणुकीचा गुन्हा 

Motorcycle sales fraud

हिंगोली (Motorcycle sales fraud) : औंढा नागनाथ येथील एका व्यक्तीला खोट्या दस्ताऐवजाव्दारे मोटार सायकल विक्री केल्याने एका आरोपीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, औंढा नागनाथ येथील गोबाडे गल्ली भागातील शेख अहेमद शेख शिकूर यांना किशन विश्वनाथ वाकोडे रा. लहूजी नगर औंढा नागनाथ याने मोटार सायकल क्र. एमएच ३८ एएम ०८९० चे चेसीस काढून त्यावर दुसरे चेसीस टाकून ते खरे असल्याचे भासून शेख अहेमद यांना मोटार सायकल विक्री केली.

१०० रुपयाच्या शपथ पत्रावर मोटार सायकल क्रमांक एमएच २८ एएम ०८९० चे इंजन क्रमांक चेसीसी क्रमांक जाणुन बूजून न टाकता त्यामध्ये मोटार सायकलचे क्रमांक एमएच २८ एएम ००९०  असे नमुद करून खोटा दस्ताऐवज तयार करून तो दस्ताऐवज खरा असल्याचे भासुन शेख अहेमद यांची फसवणु केली. या प्रकरणी १२ ऑक्टोंबरला औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात शेख अहेमद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किशन विश्वनाथ वाकोडे याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या (Motorcycle sales fraud) प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शेख हे करीत आहेत. या फसवणुकीच्या घटनेनंतर पोलिस आता अ‍ॅक्शन मोडवर आली आहे.

टैग्स: Motorcycle sales fraud