परभणी वानर हल्ला

परभणीत महादेव मंदिर परिसरात खेळणार्‍या ५ वर्षीय चिमुरडीला वानराचा चावा

Parbhani Monkey Attack: कुपटा येथील महादेव मंदिर परिसरात मुलींसोबत खेळत असताना पाच वर्षीय चिमुरडीवर वानराने हल्ला करून चावा घेतल्याची घटना दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास घडली.

परभणीत महादेव मंदिर परिसरात खेळणार्‍या ५ वर्षीय चिमुरडीला वानराचा चावा

Parbhani Monkey Attack

 

कुपटा येथील मुलगी जखमी; उपचारासाठी परभणीच्या शासकीय रुग्णालयात दाखल

परभणी (Parbhani Monkey Attack) : कुपटा येथील महादेव मंदिर परिसरात मुलींसोबत खेळत असताना पाच वर्षीय चिमुरडीवर वानराने हल्ला करून चावा घेतल्याची घटना दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत सानिका सर्जेराव पुंड (वय ५ वर्षे) ही चिमुरडी जखमी झाली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, सानिका ही महादेव मंदिर परिस रात मुलींसोबत खेळत असताना अचानक वानराने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तिच्या पायाला गंभीर जखमा झाल्या आहेत. घटनेनंतर तिला तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालय, परभणी येथे दाखल करण्यात आले आहे. या (Parbhani Monkey Attack) घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मंदिर परिसरात वानरांचा वाढता वावर लहान मुलांसाठी धोकादायक ठरत आहे. वनविभागाने याची तातडीने दखल घेऊन वानरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.