Mohadi Protest

२५ मागण्यांसाठी ९ सप्टेंबरला मोहाडीत धडक मोर्चा; आमदार रोहित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

मोहाडीत २५ प्रलंबित मागण्यांसाठी ९ सप्टेंबरला आमदार रोहित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात येणार असून हजारोंनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

२५ मागण्यांसाठी ९ सप्टेंबरला मोहाडीत धडक मोर्चा; आमदार रोहित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

Mohadi Protest

मोहाडी : शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, निराधार लाभार्थी आणि सर्वसामान्य जनतेच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवार, दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मोहाडी येथील चौंडेश्वरी माता मंदिरातून धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. आमदार रोहित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली निघणारा हा मोर्चा मोहाडी तहसील कार्यालयावर धडकणार आहे.

या मोर्चाच्या माध्यमातून शासनाकडे पुढील २५ प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत—

१) धान उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेला बोनस तात्काळ देण्यात यावा.

२) सन २०१७ व २०१९ च्या कर्जमाफीमध्ये पात्र असूनही वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा.

३) कर्जबाजारीपणामुळे मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना कर्जमाफी देऊन ‘नो ड्यूज’ प्रमाणपत्र देण्यात यावे.

४) नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर आर्थिक मदत देण्यात यावी.

५) उन्हाळी धानासाठी शासकीय खरेदी केंद्रे वेळेत सुरू करून योग्य दर मिळवून द्यावा.

६) खत, बियाणे, कीटकनाशके व इतर शेती निविष्ठांच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस धोरण करावे.

७) सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शासकीय धान खरेदी केंद्रे सुरू करावीत.

८) संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, वृद्धापकाळ पेन्शन व इतर योजनांची प्रलंबित रक्कम तात्काळ द्यावी.

९) वयोवृद्ध, निराधार व गरजू नागरिकांना गॅस, रेशन, पेन्शन व इतर योजनांचा लाभ अनावश्यक कागदपत्रांशिवाय द्यावा.

१०) मोहाडी नगरपंचायतीची विद्यमान कर आकारणी रद्द करून नियमानुसार नव्याने व परवडणारी कर आकारणी करावी.

११) ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दरवाढ देण्यात यावी.

१२) वनक्षेत्रालगतच्या शेतकरी, शेतमजूर व नागरिकांचे वनहक्क, वनजमीन व प्रलंबित दावे तातडीने निकाली काढावेत; वन्यप्राण्यांच्या नुकसानीची भरपाई वेळेत द्यावी.

१३) मनरेगा अंतर्गत प्रलंबित मजुरी व पूर्ण झालेल्या कामांची देयके तात्काळ अदा करावीत.

१४) दिव्यांग व्यक्तींना अनुदान, पेन्शन, रेशन, एसटी सवलत व इतर शासकीय योजनांचा लाभ तातडीने द्यावा.

१५) महिलांना NCMC कार्डच्या माध्यमातून एसटी प्रवास सवलत सुरळीत मिळण्यासाठी तांत्रिक अडचणी दूर कराव्यात.

१६) ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील पात्र पण वंचित महिलांना तातडीने लाभ द्यावा.

१७) शासकीय शाळांमध्ये वर्गखोल्या, इमारत, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, वीज व आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

१८) आयकर विवरणपत्र किंवा तांत्रिक कारणांमुळे पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवू नये; पात्र पंचायती समिती सदस्यांनाही नियमानुसार लाभ द्यावा.

१९) झाडीपट्टीतील पात्र कलाकारांना नियमित मानधन देण्याची व्यवस्था करावी.

२०) स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीला आळा घालून दोषींवर कठोर कारवाई करावी व विद्यार्थ्यांना योग्य दिलासा द्यावा.

२१) सन २०२१ पूर्वीपासून अतिक्रमित जागेवर वास्तव्यास असलेल्या पात्र भूमिहीन व बेघर कुटुंबांना नियमानुसार जमिनीचे पट्टे द्यावेत.

२२) महाडीबीटी तसेच विविध शासकीय योजनांचे प्रलंबित अनुदान पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावे.

२३) विविध योजनांमध्ये काम पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना प्रलंबित पुढील हप्ता वेळेत देण्यात यावा.

२४) वयोवृद्ध नागरिकांना कागदपत्रांच्या अडचणीमुळे शासकीय योजनांपासून वंचित ठेवू नये; उपलब्ध अधिकृत पुराव्यांच्या आधारे पात्रता निश्चित करून लाभ द्यावा.

२५) गोड्या पाण्यातील मासेमारी करणारे ढिवर समाजबांधवांच्या समस्या सोडविण्याबाबत कार्यवाही करावी.

हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

या सर्व मागण्या जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असून शासनाने त्यांची तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा. विशेषतः धान उत्पादक शेतकऱ्यांचा बोनस आणि सन २०१७ व २०१९ च्या कर्जमाफीपासून वंचित पात्र शेतकऱ्यांचा प्रश्न तातडीने सोडवावा.

बुधवार, दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता चौंडेश्वरी माता मंदिर, मोहाडी येथून निघणाऱ्या या धडक मोर्चात भंडारा जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी, लाडक्या बहिणी, युवक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव तसेच सर्वसामान्य नागरिकांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

शासनाने मागण्यांवर तातडीने निर्णय न घेतल्यास यापुढे अधिक तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

संबंधित सामग्री

भंडार्‍यात पालकमंत्र्यांसमोर रडत रडत व्यथा मांडणार्‍या शेतकर्‍याची आत्महत्या

भंडार्‍यात पालकमंत्र्यांसमोर रडत रडत व्यथा मांडणार्‍या शेतकर्‍याची आत्महत्या

Bhandara Farmer Suicides: मोहाडी तालुक्यातील आंधळगावजवळील धोप येथे दुष्काळाच्या संकटाने त्रस्त असलेल्या शेतकर्‍याने विहिरीत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली.

Oct 08, 2026
कुरुंद्यात अखेर संतप्त शेतकऱ्यांनी एसबीआय शाखेला ठोकले टाळे

कुरुंद्यात अखेर संतप्त शेतकऱ्यांनी एसबीआय शाखेला ठोकले टाळे

Kurunda Farmers' Protest: भारतीय स्टेट बँक  शाखेच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी त्रस्त झाले असून, सातत्याने होणाऱ्या पिळवणूक व हेळसांडीला कंटाळून ७ ऑक्टोबर बुधवार रोजी संतप्त शेतकऱ्यांनी बँकेच्या शाखा.

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026