आमदार श्वेताताई महाले पाटील

पेनटाकळी प्रकल्पातील पाण्याच्या न्याय्य वाटपासाठी उपोषण; आमदार श्वेताताई महाले पाटील यांची भेट

MLA Shwetatai Mahale Patil: नटाकळी प्रकल्पातील पाण्याच्या समान व न्याय्य वाटपाच्या मागणीसाठी मौजे पेनसावंगी येथे पंचक्रोशीतील प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांचे गेल्या दोन दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू ..

पेनटाकळी प्रकल्पातील पाण्याच्या न्याय्य वाटपासाठी उपोषण; आमदार श्वेताताई महाले पाटील यांची भेट

MLA Shwetatai Mahale Patil

 

प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची दिली ग्वाही

चिखली (MLA Shwetatai Mahale Patil) : पेनटाकळी प्रकल्पातील पाण्याच्या समान व न्याय्य वाटपाच्या मागणीसाठी मौजे पेनसावंगी येथे पंचक्रोशीतील प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांचे गेल्या दोन दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे. या आंदोलनाची दखल घेत चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील (MLA Shwetatai Mahale Patil) यांनी 4 नोव्हेंबर 2026 रोजी उपोषणस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.

​पेनसावंगी येथे सुरू असलेल्या या उपोषणात नंदकिशोर गूंजकर, विष्णू मोरे, विकास मोरे, शुभम थोरात, विनोद मोरे, शरद कणखर, गणेश जवंजाळ आणि सत्यनारायण जवंजाळ यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधव सहभागी झाले आहेत. उपोषणस्थळी भेट दिल्यानंतर आमदार श्वेताताई महाले यांनी उपोषणकर्त्यांच्या अडचणी व व्यथा सविस्तरपणे जाणून घेतल्या.

​शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या:

​संबंधित गावांना तसेच चिखली शहरासाठी पिण्याचे पाणी प्रथम आरक्षित ठेवून उर्वरित उपलब्ध पाणीसाठ्याचे समान वाटप करण्यात यावे.
​शिल्लक पाणीसाठ्यापैकी शेतकऱ्यांना सिंचनासाठी समप्रमाणात पाणी उपसा करण्याची रीतसर परवानगी मिळावी.
​संबंधित गावांतील शेतकऱ्यांचे खंडित केलेले वीज कनेक्शन तातडीने पूर्ववत जोडून द्यावेत.
​भविष्यात पेनटाकळी प्रकल्पातून पाणी खाली सोडताना वरील प्रातिनिधिक शेतकऱ्यांच्या उपस्थितीशिवाय पाणी सोडू नये.

प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन तोडगा काढावा:

यावेळी उपोषणकर्त्यांशी संवाद साधताना आमदार श्वेताताई महाले म्हणाल्या की, शेतकऱ्यांना सिंचनासाठी न्याय्य पाणीवाटप मिळणे आणि त्यांच्या अडचणी वेळेत सुटणे अत्यंत गरजेचे आहे. शासन व जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या या मागण्यांची तातडीने दखल घेऊन संयुक्त बैठक आयोजित करावी आणि पेनटाकळी प्रकल्पावरील शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन व प्रशासकीय पातळीवर सातत्यपूर्ण प्रयत्न व पाठपुरावा सुरू राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी विनायक सरनाईक संजय गाडेकर सर पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित सामग्री

खरीप पिकांचे नुकसान अन् पाणीटंचाईचा प्रश्न; आ. श्वेताताई महाले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

खरीप पिकांचे नुकसान अन् पाणीटंचाईचा प्रश्न; आ. श्वेताताई महाले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

MLA Shwetatai Mahale Patil: पुरा पाऊस, खरीप हंगामातील पिकांचे नुकसान आणि आगामी काळात निर्माण होऊ शकणारी पाणीटंचाई लक्षात घेता दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक सुरू

Nov 03, 2026
आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

MLA Shwetatai Mahale Patil: गावातील महिला व नागरिकांनी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्याकडे नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरची समस्या सोडविण्याची मागणी केली होती. रहिवासी भागातील

Sep 11, 2026