आ. श्वेता महाले

आ. श्वेता महाले यांच्या पुढाकारातून बुलढाणा जिल्ह्यातील पहिल्या बळीराजा पाणंद रस्त्याची सुरुवात चिखलीतून!

MLA Shweta Mahale: शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत बारमाही आणि सुलभ रस्ते उपलब्ध व्हावेत, शेतीमालाची वाहतूक सोयीची व्हावी आणि ग्रामीण भागातील दळणवळणाच्या सुविधांना चालना मिळावी, या उद्देशाने...

आ. श्वेता महाले यांच्या पुढाकारातून बुलढाणा जिल्ह्यातील पहिल्या बळीराजा पाणंद रस्त्याची सुरुवात चिखलीतून!

MLA Shweta Mahale

 

चिखली मतदारसंघातील विविध गावांत पाणंद रस्त्यांच्या कामांना प्रारंभ

चिखली (MLA Shweta Mahale) : शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत बारमाही आणि सुलभ रस्ते उपलब्ध व्हावेत, शेतीमालाची वाहतूक सोयीची व्हावी आणि ग्रामीण भागातील दळणवळणाच्या सुविधांना चालना मिळावी, या उद्देशाने राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील पहिल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज २ नोव्हेंबर 2026 चिखली विधानसभा मतदारसंघातील मौजे किन्ही सवडत येथे आमदार श्वेता महाले पाटील (MLA Shweta Mahale) यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यात या योजनेअंतर्गत सुरू झालेला हा पहिलाच रस्ता ठरला असून, जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून गती मिळत असून, राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणंद रस्त्यांच्या प्रश्नाला प्राधान्य दिले आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आमदार श्वेता महाले पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यातूनच किन्ही सवडत येथील महादेव मंदिर ते जलसंधारण कट्टा या रस्त्याच्या कामाला सुरुवात करून त्यांनी या उपक्रमाचा मतदारसंघात प्रत्यक्ष शुभारंभ केला.

यानंतर चिखली मतदारसंघातील मौजे टाकरखेड मु., मौजे कव्हाळा ते अमडापूर, मौजे करणखेड येथील मातोश्री पांदण रस्ता अशा विविध ठिकाणच्या रस्त्यांच्या कामांचेही आमदार श्वेता महाले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 

शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी आजही अनेक ठिकाणी चांगल्या रस्त्यांची सुविधा उपलब्ध नाही. पावसाळ्यात चिखलातून वाट काढत शेतात जावे लागते, तर शेतीमाल बाजारपेठेत पोहोचविताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा हा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार श्वेता महाले यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांतून मतदारसंघातील विविध गावांमध्ये पाणंद रस्त्यांच्या कामांना गती मिळत असून, यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत रस्ता पोहोचविणे हेच या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट असून, ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहणार आहोत, अशी भूमिका यावेळी आमदार श्वेता महाले (MLA Shweta Mahale) यांनी व्यक्त केली.

या उद्घाटन सोहळ्याला उपविभागीय अधिकारी शरद पाटील, तहसीलदार विजय सवडे, गटविकास अधिकारी समाधान वाघ, जिल्हा परिषद उपकार्यकारी अभियंता झीने, अभियंता रवींद्र राऊत, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजय गाडेकर, तालुकाध्यक्ष अमोल साठे, शिवसेना नेते भास्कर राऊत, कपिल खेडेकर, शरद गुंजकर, कव्हाळा सरपंच आकाश सुरुशे, करणखेड सरपंच रवींद्र इंगळे, अरुण पाटील, विठ्ठलदादा गायकवाड, दिलीप पाटील, भागवत खेनते, सरपंच ज्ञानेश्वर डहाके, बळीराम काळे, लक्ष्मण पाटील शेळके, बंडू पाटील गायकवाड, मंडळ अधिकारी ए.टी. शेळके यांच्यासह विविध गावांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बुलढाणा जिल्ह्यातील पहिल्याच मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्त्याचा शुभारंभ चिखली मतदारसंघातून झाल्याने या योजनेच्या अंमलबजावणीत चिखलीने महत्त्वपूर्ण सुरुवात केली आहे. आता या रस्त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत विकासाची वाट पोहोचणार आहे.

टैग्स: MLA Shweta Mahale

संबंधित सामग्री

बुलढाणा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीच्या नियोजनाचा आमदार श्वेता महाले पाटील यांनी घेतला आढावा

बुलढाणा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीच्या नियोजनाचा आमदार श्वेता महाले पाटील यांनी घेतला आढावा

MLA Shweta Mahale Patil: संभाव्य दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी बुलढाणा तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणांच्या तयारीचा आढावा घेणारी विशेष समन्वय बैठक धाड येथे आ. श्वेता महाले पाटील...

Nov 04, 2026
कर्जवसुलीच्या नावाखाली महिलांच्या सन्मानाशी खेळाल तर खपवून घेणार नाही: आमदार श्वेता महाले पाटील

कर्जवसुलीच्या नावाखाली महिलांच्या सन्मानाशी खेळाल तर खपवून घेणार नाही: आमदार श्वेता महाले पाटील

MLA Shweta Mahale Patil: ग्रामीण भागातील महिलांना कर्जाच्या नावाखाली आर्थिक व्यवहारात अडकवून वसुलीसाठी त्यांचा मानसिक छळ करण्याचे प्रकार आता खपवून घेतले जाणार नाहीत, अशी ठाम भूमिका...

Nov 02, 2026
पेनटाकळीच्या पाण्याचे समन्यायी वाटप करा: आमदार श्वेता महाले पाटील

पेनटाकळीच्या पाण्याचे समन्यायी वाटप करा: आमदार श्वेता महाले पाटील

MLA Shweta Mahale Patil: पेनटाकळी प्रकल्पातील पाण्याच्या वाटपावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आमदार श्वेता महाले पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना पाणी...

Nov 01, 2026
दिवाळीपूर्वी चिखली विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना मिळणार ६४  कोटींची अग्रीम मदत

दिवाळीपूर्वी चिखली विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना मिळणार ६४  कोटींची अग्रीम मदत

MLA Shweta Mahale Patil: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये..

Oct 14, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

MLA Shweta Mahale: बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व पशुपालकांसमोरील अडचणी लक्षात घेऊन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील

Oct 05, 2026