आमदार श्वेता महाले पाटील

बुलढाणा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीच्या नियोजनाचा आमदार श्वेता महाले पाटील यांनी घेतला आढावा

MLA Shweta Mahale Patil: संभाव्य दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी बुलढाणा तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणांच्या तयारीचा आढावा घेणारी विशेष समन्वय बैठक धाड येथे आ. श्वेता महाले पाटील...

बुलढाणा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीच्या नियोजनाचा आमदार श्वेता महाले पाटील यांनी घेतला आढावा

(MLA Shweta Mahale Patil)

 

नियोजनशून्य कारभारावर अधिकाऱ्यांना धरले धारेवर!
धाड येथे पार पडलेल्या आढावा बैठकीत नाराजी व्यक्त;
दुष्काळी उपाययोजनांमध्ये तातडीने सुधारणा करण्याचे प्रशासनाला निर्देश

बुलढाणा (MLA Shweta Mahale Patil) : संभाव्य दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी बुलढाणा तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणांच्या तयारीचा आढावा घेणारी विशेष समन्वय बैठक आज धाड येथे आमदार श्वेता महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत पिण्याच्या पाण्याचे नियोजन, ग्रामीण पाणीपुरवठा, जलस्रोतांची उपलब्धता, जनावरांसाठी चारा व पाणी, तसेच दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना द्यावयाच्या मदतीसंदर्भात चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान बुलढाणा तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेताना अनेक बाबींमध्ये नियोजनाचा अभाव असल्याचे आमदार श्वेता महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांच्या निदर्शनास आले. विविध विभागांमध्ये आवश्यक समन्वयाचा अभाव आणि उपाययोजनांच्या तयारीतील त्रुटींवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. केवळ कागदोपत्री माहिती देण्यापेक्षा प्रत्यक्ष परिस्थितीचा अभ्यास करून ठोस नियोजन करणे अपेक्षित असताना प्रशासनाकडून पुरेशी तयारी झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

नियोजनशून्य कारभारावर आमदारांची तीव्र नाराजी

दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्यासाठी धावपळ करण्यापेक्षा आतापासूनच त्याचे नियोजन होणे आवश्यक आहे. मात्र, बुलढाणा तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेताना अनेक बाबींमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले. यावर आमदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत प्रशासनाच्या कार्यपद्धतीत तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश दिले. पाणीटंचाईग्रस्त गावांची अचूक माहिती, उपलब्ध पाणीसाठा, पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था आणि संभाव्य गरजांचा वास्तवदर्शी आढावा घेण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

दुष्काळी उपाययोजनांसाठी विभागांमध्ये समन्वय आवश्यक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असून, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनानेही त्याच तत्परतेने काम करणे अपेक्षित आहे. महसूल, कृषी, पाणीपुरवठा आणि पशुसंवर्धन विभागांनी परस्पर समन्वय ठेवून पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाणी, जनावरांसाठी चारा व पाणी आणि आवश्यक ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा यांचे नियोजन करावे, असे त्यांनी (MLA Shweta Mahale Patil) सांगितले.

संभाव्य पाणीटंचाईच्या काळात नागरिक, शेतकरी आणि पशुपालकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने आपल्या कामकाजात तातडीने सुधारणा करून प्रभावी नियोजन सादर करावे. बुलढाणा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना वेळेत पूर्ण कराव्यात, असे स्पष्ट निर्देश (MLA Shweta Mahale Patil) आमदार श्वेता महाले पाटील यांनी या बैठकीत दिले.

टैग्स: MLA Shweta Mahale Patil

संबंधित सामग्री

कर्जवसुलीच्या नावाखाली महिलांच्या सन्मानाशी खेळाल तर खपवून घेणार नाही: आमदार श्वेता महाले पाटील

कर्जवसुलीच्या नावाखाली महिलांच्या सन्मानाशी खेळाल तर खपवून घेणार नाही: आमदार श्वेता महाले पाटील

MLA Shweta Mahale Patil: ग्रामीण भागातील महिलांना कर्जाच्या नावाखाली आर्थिक व्यवहारात अडकवून वसुलीसाठी त्यांचा मानसिक छळ करण्याचे प्रकार आता खपवून घेतले जाणार नाहीत, अशी ठाम भूमिका...

Nov 02, 2026
पेनटाकळीच्या पाण्याचे समन्यायी वाटप करा: आमदार श्वेता महाले पाटील

पेनटाकळीच्या पाण्याचे समन्यायी वाटप करा: आमदार श्वेता महाले पाटील

MLA Shweta Mahale Patil: पेनटाकळी प्रकल्पातील पाण्याच्या वाटपावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आमदार श्वेता महाले पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना पाणी...

Nov 01, 2026
दिवाळीपूर्वी चिखली विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना मिळणार ६४  कोटींची अग्रीम मदत

दिवाळीपूर्वी चिखली विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना मिळणार ६४  कोटींची अग्रीम मदत

MLA Shweta Mahale Patil: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये..

Oct 14, 2026
बळीराजाचे अश्रू पुसण्यासाठी श्वेता महाले पालकमंत्र्यांसोबत बांधावर

बळीराजाचे अश्रू पुसण्यासाठी श्वेता महाले पालकमंत्र्यांसोबत बांधावर

MLA Shweta Mahale Patil: शेतकऱ्यांची व्यथा केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्ष शासनापर्यंत पोहोचावी, यासाठी आमदार श्वेता महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मदत..

Sep 24, 2026
पिकं करपली, शेतकरी हवालदिल; श्वेता महाले पाटील आढावा बैठकीत भावनिक

पिकं करपली, शेतकरी हवालदिल; श्वेता महाले पाटील आढावा बैठकीत भावनिक

MLA Shweta Mahale Patil: शेतकरी वर्षभर कष्ट करून पिकाची काळजी घेतो; मात्र ऐन उत्पादनाच्या काळात पावसाने दगा दिल्याने त्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे.पिकं करपली, शेतकरी हवालदिल

Sep 20, 2026